नवीन लेखन...

बाप्पा मोरया !

शब्दांना जसे त्यांचे स्वतःचे अर्थ असतात,तसेच रंग,रूप,नादही असतात. धीरगंभीर स्वरात उच्चारलेले शब्द मनावर अधिराज्य करतात.

संकष्टी चतुर्थी अचानक आमच्या घरी आली. बहुदा ऑफिस मधील सहकाऱ्याच्या सांगण्यावरून वडिलांनी हा उपवास सुरु केला. आई-आजी आणि नंतर मी तो संस्कार आपोआप बाळगला आजवर. भुसावळला दरमहा चंद्रोदयापूर्वी वडील स्नान करीत, सोवळे नेसून तबकातल्या गणपतीला अभिषेक करीत आणि २१ वेळा अथर्व शीर्षाचे पठण करीत. त्यांचा तो दीर्घ, गंभीर आवाज अजूनही कानात असतो. त्यावेळी आईची मोदकाची लगबग असे. मोदक हा वडिलांचा दंडक होता. महिन्यातील एका दिवशी मिळणारी ही मेजवानी आम्हांला अपूर्वाईची असे. आरती झाली की आम्हाला तो प्रसाद मिळे.
गणेशोत्सवात एकदा तरी ( गणेश चतुर्थी अथवा अनंत चतुर्दशीला- सवडीनुसार कारण वडिलांची फिरस्तीची नोकरी होती ) अथर्व शीर्षाचे २१ वेळा पठण ते करायचे. ” ओम गं गणपतये नमः” हे त्यांचे स्वर माझ्या मुलाच्याही कानी कोरले गेले.

३-४ वर्षांचा असताना त्याने इस्लामपूरला हट्ट धरला- ” आपणही पुण्यासारखा आपल्या घरी दहा दिवसांचा गणपती बसवू.” आम्ही उभयता या गोड हट्टापुढे मान तुकविली. यथावकाश गौरी विराजमान झाल्या आणि कालौघ अधिक तेजाळला.
आमच्या घरी (पूर्वीपासून ) गौरी नव्हत्या. त्यामुळे माहेरवाशीण म्हणून आई आणि तिच्याबरोबर आम्ही लहानपणी जळगांवला दोन दिवस जायचो दर्शनाला . त्या भागात ” महालक्ष्मी ” म्हणतात.

मुलाचे प्रेम नातीने घेतले. ती एक पाऊल पुढे. घरचा गणपती ती ठरवते. आठ दिवस आधीपासून स्टॉल्सचे विंडो-शॉपिंग सुरु असते. स्पेसिफिकेशन्स मनात तयार असतात. तसाच गणपती घ्यायचा हा तिचा हट्ट आम्ही पुरवतो. गणेशप्रेम असे पिढ्यांच्या धमन्यांतून पुढे सरकले आहे. आज रात्री गणोबा घरी येतील. कालपासून तिची लुडबुड युक्त लगबग सुरु आहे आरास करण्याची.

मागील वर्षीपासून घरी मूर्ती आणून रंगविणे तिने सुरु केले आहे. मुलगाही शाळेतून दरवर्षी मूर्ती आणून रंगवीत असे. त्याच्या जुन्या मूर्तींबरोबर आता नातीच्याही मूर्ती आमच्या शोकेस मध्ये विराजमान ! आंतरिक प्रवाह सुरु राहोत.

पुढचे दहा दिवस आनंदाचे, चैतन्याचे, मोठमोठ्याने आरती म्हणण्याचे, मोदक आणि खिरापतीवर ताव मारण्याचे !
आज सकाळी झाडावरून ओंजळीत काढलेली फुले घरात नेताना त्यांतील दोन फुले अचानक जमिनीवर सांडली.

गेल्या दोन वर्षात अनेक जिवलग त्या फुलांसारखे हातातून निसटले.

” उरलेल्या ” फुलांनिशी हा सण साजरा करायचा आहे.

गणपती बाप्पा मोरया !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..