नवीन लेखन...

बरे झाले देवा

तुकाराम महाराज यांनी एकदा देवाला नमस्कार करुन म्हटले होते. तसेच मी ही देवाला नमस्कार करुन म्हणते की बरे झाले देवा… माणूस किती भ्रमात असतो ना. मी असा मी तसा. मला काय होणार नाही. मी कुणाच्या मिंध्यात राहणार नाही. पण हे सगळे कधी कधी एका क्षणात संपून जाते. होत्याचे नव्हते होते. हळूहळू त्यातून सावरुन एका वेगळ्याच पद्धतीने विचार करायला शिकतो याचे उदाहरण म्हणजे मीच….
बऱ्याच वर्षापूर्वी अपघातात एक कान पूर्ण बहिरा झाला. एका वर भागवले. पण तेही जमेना. त्यामुळे एक श्रवण यंत्र आणले. आता ती डबी व कानात वायर घालून हिंडणे जड जाऊ लागले. अपमानास्पद वाटू लागले. आणि इथे स्थायिक झाल्यावर त्याची आवश्यकता नव्हती. कुणी ओळखीचे नाही. बोलणे नाही तर ऐकायचा प्रश्नच नाही. आणखीनच कमी ऐकू यायला लागले. लग्न झाल्यावर मुलाचे तेव्हा गरज पडली. म्हणून तपासणी करून नवीन यंत्र आणले. पण बोलायचे कुणाशी दोघेही कामावर. तेही काढून ठेवले. कारण कानावर दुहेरी साज चष्मा आणि यंत्र पेलवेना. साजाची सवय नव्हती म्हणून कान सजवणे बंद केले. नातवाच्या मुंजीच्या वेळी परत साज चढवून सजले…
आणि आता अगदीच संन्यास घेतला आहे. डबी बंद केला आहे साज पण या बहिरेपणांनी मी काय काय शिकले आहे पहा आणि जोडीला हा आजार जोडीदार मिळाला. मग काय मज्जाव मज्जा…
कानावर पडत नाही. चौकशी बंद
टिव्ही वरची चित्र पाहून कथानक समजून घेणे.
घरात आवाज चढले तरी आपण शांत.
तपस्वी सारखे एका जागी बसणे.
स्थितप्रज्ञ राहाणे.
फोन करत नाही उचलत नाही म्हणून आनंद आहे.
नियंत्रण आणि संयम. प्रत्येक गोष्टीवर.
कसलाही आळ येत नाही.
चिंतन मनन करत राहणे.
भोग उपभोगत रहायचे.
आपल्या पेक्षा जगात अजूनही वाईट परिस्थितीत आहेत.हे जाणणे.
समोर आयुष्याचा जोडीदार आहे पण बोलायचे नाही.
एकाग्रता भंग होत नाही.
बैठक खूप वेळ साधाता येते.
भूतकाळात जाऊन यायचे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शांतता आहे म्हणून नामस्मरण. पारायण वगैरे विचलित न होता करता येते. भरपूर वेळ असतो. आणि हे सगळे फळाची अपेक्षा न ठेवता करत रहायचे. छान आहे ना? म्हणूनच देवाला म्हणते की बरे झाले देवा मला असे झाले ते. नाहीतर हे असे घडले असते का? जे होते ते चांगल्या साठीच असे म्हणतात ते काही खोटे नाही.
— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..