नवीन लेखन...

बॅरोमीटर

हवामान अंदाज वर्तवताना हवेच्या दाबावर वातावरणातील बदल काही प्रमाणात अवलंबून असतात जर हवेचा दाब जास्त असेल तर सगळे काही सुरळीत असते पणदाब कमी होत गेला, की वातावरणात ओलसरपणा येतो. हवेचा दाब ज्या साधनाने मोजला जातो त्याला बॅरोमीटर असे म्हणतात म्हटले जाते.

आपण रोजच्या आयुष्यात जेव्हा वापरत असतो, तेव्हा वातावरणात जे वायुंचे मिश्रण असते, त्यांचा दाब आपल्या शतावर पडत असतो. जेव्हा आपण समुद्राच्या तळाशी जातो, तेव्हा पाण्याचा दाब असल्याने तुम्हाला ऑक्सिजनची नळकांडी असूनही श्वास घेणे जड जाते. पण मोकळ्या हवेत असताना आपल्यावर जरी हवेचा दाब असला, तरी त्यामुळे श्वसनात अडथळा येतनाही नाही कारण आपली फुप्फुसे हवेने भरलेली असतात तसेच एका वेळी हवेचा दाब आतून बाहेरून सारखाच असतो.

त्यामुळे पाण्याचा दाव जाणवतो तसा हवेचा दाब आपल्याला जाणवत नाही पण ती असती हे मात्र खरे, समुद्रसपाटीला हवेचा दाब जास्त असतो व पर्वतांसारख्या उंच जागी तो कमी होत जातो, उंचीवर ऑक्सिजन कमी असल्याने गिर्यारोहकांना ऑक्सिजनची नळकांडी न्यावी लागतात. विमानातही प्रवाशांना श्वास नीट घेता यावा यासाठी प्रेशराइज्ड केबिन असतात, त्यामुळे हवेचा दाब योग्य राहतो. एखाद्या नळीतील हवेचा दाब हा मापनपट्टीवर मोजता आला तर.. या कल्पनेतून बॅरोमीटर तयार झाला. आधुनिक बॅरोमीटर हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे असून त्यात एलसीडी डिस्प्लेवर हवेच्या दाबाचा आकडा दिसतो.

टॉरिसेलियन व ॲनेरॉइड असे दोन पारंपरिक प्रकार यात आहेत. टॉरिसेलियन बॅरोमीटरमध्ये एक बंद नळी असते ती पाऱ्यामध्ये कक्ष तपमानला ठेवली जाते. तपमापकाप्रमाणेच यात पारा किंचित वर चढत जातो. पाण्यापेक्षा पारा हा काहीसा घट्ट असल्याने कमी उंचीची नळी वापरावी लागते.

हा बॅरोमीटर गॅलिलिओचा विद्यार्थी असलेला इटालियन गणितज्ञ टॉरिसेली याने शोधून काढला. पात्रातील पाऱ्यावर हवेचा दाब पडल्याने नळीतील पारा वर चढत जातो त्याच्या आधारे नळीत पारा कुठपर्यंत वर चढला हे बघून हवेचा दाब सांगता येतो. पाराविरहित डायल बॅरोमीटरमध्ये एक धातूची डबी असते त्याला डायल असते. त्यावर आकडे असतात. या डबीवर हवेचा दाब पडताच आतील एक स्प्रिंग मागेपुढे होते. तिच्या हालचालीचे दृश्य स्वरूप डायलवर काटा फिरण्यात दिसते त्यावरून हवेचा दाब समजतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..