ह्याचे ०.५-१.५ मी उंच वर्षायू क्षुप असते.काण्ड सरळ असून फांद्या मजबूत असतात.पाने २.५-८ सेंमी लांब किंचित गोल अथवा हृदयाकृती,एकान्तर असतात पत्र धारा दन्तुर असतात.फुले पिवळसर निळे पुष्प दंड मोठा व त्यात १-३० फुले गुच्छात उगवतात.फळ काळे व गुच्छात येते.बीज काळे लहान कोवळे व विशिष्ट उग्रगंधी असते.बीज मगज पांढरा असतो.
बाकुचीचे उपयुक्तांग बीज व बीज तैल आहे.हे चवीला गोड,कडू,तिखट असून उष्ण आहे.तसेच हल्के व रूक्ष आहे.बाकुची कफवातनाशक व पित्त प्रकोपक आहे.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)कृमींवर ५ दिवस बाकुची चुर्ण देऊन मग त्यावर एरंडाचे तेल पोटात देतात संडासला पातळ होऊन कृमी पडून जातात.
२)श्वित्र कुष्ठात व जीर्ण त्वचारोगात बाकुचीचा उपयोग होतो.
३)उष्ण असल्याने बाकुची कामोत्तेजक आहे म्हणून ती क्लैब्यात वाजीकर कार्य करते.
४)खरजेवर बाकुचीबी व कारळे गोमुत्रात वाटून लेप लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©Dr Swati Anvekar
Leave a Reply