बीट हेसुद्धा पोषक कंदमूळ आहे. एक अत्यंत औषधी तसेच सर्वांना अगदी मनापासून आवडणारे फळ म्हणजे बीट. वास्तविक बीटरूट हा सेंट्रल अमेरिका येथून झाला.
तसेच नंतर ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाला. याचा जन्म भारतात झाला का? व ते कसे आले, पण हे सांगणे कठीणच. मात्र ते ब्रिटिशांनीच भारतात आणले. आता पाश्चिमात्य लोक याला नुसते बीट म्हणतात, कोणी बीटरूट म्हणतात. तर कोणी गार्डन बीट असे म्हणतात, तर अनेक लोक हे रेडबीट असेही म्हणतात. बीट हे कच्चेदेखील खाता येते तसेच ते उकडूनही खाता येते. तसेच त्याच्या लाल रंगामुळे बीटरूटचा वापर सॅलेड म्हणूनही करता येतो कारण बीट, काकडी, गाजर, मुळा, टॉमेटॅ वगैरे खाण्यामध्ये जेवणात लज्जत येते. पाश्चिमात्य देशात बीटरूटची लोणची बनविण्याची परंपरा असते.
बीट हे एक अनेक प्रकारे वापरता येते. यात भरपूर खनिज द्रव्ये तसेच जीवनसत्त्वे यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. तसेच यात प्रथिने ही भरपूर असतात. तसेच छातीत ठणक्यावर याचा वापर करण्यात येतो.
बिटरूट याच वनस्पती औषधे म्हणून याचा वापर करतात. बीटने ह्रदयरोगात थोडा फार फायदा होतो. तसेच बीटरूटचा रस घेतल्याने रक्तदाब कमी होतो व रक्तप्रवाह सुरळीतपणे सुरू होतो.
– मदन देशपांडे
Leave a Reply