नवीन लेखन...

बार्सिलोनातले beggars…

बार्सिलोना तसं म्हणाल तर मुंबई सारखंच खूप मोठ्ठ आणि पसरलेलं Spain मधील एक शहर! त्यामुळे सहाजिकच अफाट लोकसंख्या आणि त्यातूनच निर्माण झालेली उत्कृष्ठ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transportation)!
आता public transport आणि महानगर म्हंटलं की भुरटे चोर आलेच, त्यात आम्हाला आमच्या एका हितचिंतक cum friend नी आधीच घाबरवून ठेवले होते. त्याच्या भावाचे wallet म्हणे train transit मध्ये लंपास केले होते. आम्ही Day one पासूनच खूप काळजीपूर्वक प्रवास करत होतो. आम्हाला उलट bus, train, tram, funicular railway सगळीकडेच खूप friendly लोक भेटले.

Transportation समजायला तसे सोपे आणि frequency पण चांगली आहे. एकच खटकणारी गोष्ट म्हणजे Public smoking! खूपच प्रमाणात लोक smoke करतात आणि अधूनमधून train, bus station जवळ (beggars/ homeless ) भिकारीही दिसतात.

भिकार्‍यांच्याही वेगवेगळ्या तर्‍हा!! एक रस्त्याच्या कोपर्‍यात footpath वर अंथरूण घालून हातात smart phone घेऊन web browsing करत होता, तर एक सगळ्यांना उगाचच greet करत होता. आम्ही जपूनच तिथून सटकलो.

बार्सिलोनाहून परतायच्या आदल्या दिवशी आम्ही एका प्रचंड मोठ्ठ्या church मध्ये गेलो होतो. ते church 150 वर्षांपासून “under construction ” च आहे आणि बांधकाम पूर्ण होण्यास अजून अनेक वर्षं लागतील म्हणे…
त्यांना जरा अयोध्येतील राम मंदिराचा तपशील द्यायला हवा! (जय श्रीराम!) असो…

तर आमचे तिकीटाचे पैसे (donation for construction) वसूल करून आम्ही बाहेर आलो तेंव्हा सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. सुमारे साडेचार पाच वाजले असतील. समोरच McDonald’s दिसले आणि आम्ही आपसूकच आत
शिरलो. तसे snacks साठी घेतल्या pastries उरल्या होत्या बॅगेत ,पण गरम गरम fries and sandwiches असताना ते कोण खाणार ? तरीही मी अगदी सतर्क आणि निष्णात गृहिणी प्रमाणे 3 slices table वर काढून ठेवल्या.

मला त्वरितच परत बॅगेत ठेवण्याची सर्वाज्ञा झाली आणि मी ती. bag परत ठेवून दिली. आम्ही KIOSk वर order देऊन , आमच्या नंबरची वाट बघत असतानाच अचानक बर्‍यापैकी सुशिक्षित दिसणारा, पाठीवर backpack घेतलेला असा एक तरुण माणूस एकदम दुकानात शिरला. बर्‍याच लोकांशी Spanish/ Catalan मध्ये काहीबाही बोलत आमच्यासमोर येउन उभा राहिला. आधी. वाटले salesman असावा, पण मग त्याने खाणाखुणा सुरु केल्या तेंव्हा कळले की त्याला भूक लागलेली. मी लगेच चेहर्‍यावर विजयी भाव आणून त्या महागड्या pastries ची bag बाहेर काढली व त्याला देऊ लागले. तर तो अत्यंत नाखूशिने आणि घृणास्पद नजरेने आमच्याकडे पाहत तोडक्या मोडक्या इंग्रजीत/
Spanish आणि जमतील तितके हावभाव करत , McDonald’s चे KIOSK machine दाखवत म्हणाला की “order for me from here.. I don’t want that”.

मी ती bag काढली तश्शीच पटकन आत ठेवून दिली आणि त्या अगंतुक इसमाला मराठीतून खूप शिव्या हासडल्या!!
त्याला शिव्यांचा अर्थ कळला नसेल कदाचित पण माझ्या आविर्भावावरून एकंदरीत अंदाज बांधून तो बावचळून तिथून निघून गेला पण आम्हाला हा “Barcelona च्या beggars” चा किस्सा अजून हसण्यासाठी पुरतोय….

गीता शिरवळकर

आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..