प्रत्येक मराठी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा असलेल्या माध्यमिक शालान्त परीक्षेची सुरुवात १९४९ साली २२ मार्च रोजी झाली.
ब्रिटिशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी शिक्षण पद्धती मात्र पूर्वीची ब्रिटिशांचीच होती. स्वतंत्र भारताचा कारभार क्षमतेने चालवायचा तर शिक्षण पद्धती भारतीयच हवी, हा विचार पुढे आला. भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यामुळेच प्रत्येक राज्यात माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन झाली. तसेच महाराष्ट्र राज्य शालान्त शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. या मंडळाने ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे पहिली माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) १९४९मध्ये आजच्या दिवशी सुरू झाल्या. त्याबरोबरच जुन्या मॅट्रिकच्या परीक्षा रद्द झाल्या. पुढे अकराऐवजी दहा वर्षांचा शालान्त परीक्षा अभ्यासक्रम सुरू झाल्या.
७५ ची एस एस सी ची बॅच, म्हणजे अकरावी एस एस सी ची शेवटची बॅच. त्याच वर्षी दहावी एस एस सी ची पहिली बॅचही होती. त्या वर्षी बोर्डाने प्रथमच कॉम्प्युटर वापरला होता. निकालात बऱ्याच चुका झाल्या होत्या आणि त्या बोर्डाने नंतर निस्तरल्याही.
Leave a Reply