सांगते जरा ऐका, नका दाखवू हे रूप,
माणूसच खातो चाखून माखून, मेल्या मड्यावरचं तूप !!
हाड् म्हटलं की, कुत्रा तरी निघून जातो,
माणूस मात्र कुत्रं बनून, शेपूट हलवित राहतो!!१!!
सांगते जरा ऐका, नका……!!
तुझं तू माझं मी, असं फक्तं मुखाने बोलतो,
डोळ्यांआड दुसऱ्या ताटात जिभाळ गाळीत डोकावतो!!२!!
सांगते जरा ऐका, नका……!!
परके आले पुढ्यात, तत्त्व प्रदर्शन मांडतो,
वेळ आली स्वत:ची की झटकन धुळ झाडतो!!३!!
सांगते जरा ऐका, नका……!!
म्हणतो खाते मांजर, डोळे मिटून लोणी,
मी मज्जा मारताना, पाहू नये हो कोणी!!४!!
सांगते जरा ऐका, नका……!!
चटक मटक लोणचं हवं, रोजच्या ताटाला नवं,
भुलवून म्हणे “तुझ्या-माझ्या संसाराला अजून काय हवं?”!!५!!
सांगते जरा ऐका, नका……!!
हौस मज्जा मस्ती दररोज हवी बासणीला,
मेहनतीच्या वेळी राहती, चटपटीत कारणं याच्या वस्तीला!!६!!
सांगते जरा ऐका, नका……!!
आवर नाही स्वत:स, तोच म्हणतो हो सावर,
तुझ्या आधी भरून घेतो, माझी सोन्याची घागर !!७!!
सांगते जरा ऐका, नका दाखवू हे रूप,
माणूसच खातो चाखून माखून, मेल्या मड्यावरचं तुप!!
— श्वेता संकपाळ
याला जीवन ऐसे नाव, या भवसागरात प्रवाहाच्या विरोधात पोहणे सोडून प्रवाहासह वहावच लागतं,,,he who stands by truth stands alone,