नवीन लेखन...

बंगाली नाटककार दीनबंधू मित्र

दीनबंधू मित्र हे प्रसिद्ध बंगाली नाटककार व प्रहसनकार म्हणून विशेष प्रसिद्ध होते. त्यांच्या काही काव्यरचनाही लोकप्रिय आहे.

बंगाल मधील नडिया जिल्ह्यातील चौबेडिया गावी जन्म झाला. पिता कालाचाँ द मित्र. कलकत्त्यास प्रथम हेयर स्कूलमध्ये त्यांनी शिक्षणास आरंभ केला आणि पुढे हिंदू कॉलेजमधून १८५० मध्ये ते ‘ज्युनियर’ परीक्षाही पास झाले. यानंतर १८५३ मध्ये ते अध्यापक परीक्षा पास झाले. १८५५ सालापासून नोकरीच्या निमित्ताने बिहार, ओरिसा, डाक्का,नडिया इ. प्रदेशात भ्रमण.

१८५५ मध्ये प्रथम पाटण्यास पोस्टमास्तर म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८७० मध्ये कलकत्त्यास अधिसंख्य निरीक्षक (सुपरन्युमरी इन्स्पेक्टिंग) पोस्टमास्तर असताना त्यांना ‘राय बहादूर’ ही पदवी मिळाली. बंगालमध्ये १८५५ च्या सुमारासच ‘नीळकर’ साहेबांचे अत्याचार प्रकाशात येऊ लागले होते. या विषयावर दीनबंधूंनी त्यांचे नील दर्पण(१८६०) हे पहिले नाटक लिहिले. यात त्यांनी भारतातील तत्कालीन शासन-शासित संबंधांना वाचा फोडून नीळीच्याव्यवसायातील स्वदेशी कामगारांच्या दुःखाबद्दल सहानुभूती दर्शविल्यामुळे राजकीय परिसरात बरीच खळबळ उडाली. नील दर्पण नाटकाचा इंग्रजी अनुवाद मायकेल मधुसूदन दत्त यांनी केला असावा,असा अंदाज आहे. या नाटकात मुख्यतः करु ण रसावर भर आहे. पण दीनबंदू हे प्रहसनकार म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत.

सधवार एकादशी (१८६६), बिये पागला बुडो(१८६६), जामाई बारिक (१८७२) या लोकप्रिय प्रहसनांमधून त्यांच्या व्यंगपूर्ण विनोदबुद्धीचा हातखंडा जाणवतो. शिकत असतानाच दीनबंधूंनी गद्य-पद्यलेखनास प्रारंभ केला होता. या प्राथमिक रचना ईश्वरचंद्र गुप्त (१८१२–५९) यांच्या संवाद प्रभाकर व संवाद साधुरंजन या पत्रकांमधून प्रसिद्ध होत. नवीन तपस्विनी नाटक (१८६३),लीलावती (१८६७),सुरधुनी काव्य (१८७१),द्वादश कविता(१८७२),कमले कामिनी नाटक (१८७३)इ. त्यांच्या नाटक व काव्यरचना प्रसिद्ध असूनही ते बंगाली साहित्यविश्वात प्रहसनकार म्हणूनच विशेष नावाजले गेले. बंगाली नाटकक्षेत्रात त्यांचे स्थान लक्षणीय आहे. त्यांच्या नाटक व प्रहसनांचे प्रयोग ‘नॅशनल थिएटर’ मध्ये होत असत.

दीनबंधु मित्र यांचे निधन १ नोव्हेंबर १८७३ रोजी झाले.

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ वीणा आलासे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..