नवीन लेखन...

त्रिदेव ..त्रिमूर्ती .. ! (बेवड्याची डायरी – भाग १५)

विमनस्क असा बसून राहिलो प्राणायाम संपायची वाट पहात…माझे लक्ष वेधून घेणारे एक दृश्य दिसले … वार्डात भिंतीला टेकून तीन जण अगदी शांतपणे बसलेले होते ..हे तीन जण येथे आल्यापासून माझ्या कुतूहलाचा विषय बनेलेल होते ..त्यातील एक जण खूप जाडा ..वजन किमान १०० किलो असावे ..बुटका ..रंगाने काळा तसेच त्याचा एक डोळा तिरळा होता ..वय सुमारे २२ वर्षे असावे ..त्याचे नाव योगेश असे होते ..हा योगेश प्रथम दर्शनीच मंदबुद्धी वाटत होता तसेच त्याच्या रंगरूपामुळे जरा तो भीतीदायकच वाटे ..अतिशय हळू हळू वार्डात फिरत रहाणे ..मध्येच कुठेतरी भिंतीला टेकून उभे राहणे असे याचे नेहमीचे चाललेले असे ….प्रत्येक वेळी ..चहा ..नाश्ता ..जेवणाच्या वेळी मात्र योगेशच्या हालचाली वेगवान होत असत ..तो त्या वेळी सर्वात आधी नंबर लावून उभा राहत असे ..

दुसरा एक जण लौकिक नावाचा ..हा देखील साधारण २५ वर्षांचा तरुण मुलगा ..उंच ..लुकडा ..वार्डात हा अतिशय वेगाने संपूर्ण वार्डमध्ये दिवसभर चकरा मारत असे ..त्याचे चालण्याचा वेग योगेशच्या दहापट होता ..कोणाशीच काहीही न बोलता वेगवान चकरा मारण्याचे काम तो इमान इतबारे करे..तिसरा प्रकाश ..हा प्रकाश बहुधा अंगात शर्ट किवां बनियन असे काहीच घालत नसे ..कमरेवर एक बर्म्युडा आणि वर उघडा असा याचा नेहमीचा वेष ..अंगाने तसा बारीकच ..हा दिवसभर वार्डात दोरीवर वाळत घातलेल्या कपड्यांकडे लक्ष देवून असे ..त्याला आवडलेला एखादा टी शर्ट .. विजार ..अधूनमधून अंगावर घालत असे ..ते कपडे आपलेच असावेत असा याचा अजिबात आग्रह नसे ..कोणाचेही कपडे तो तात्पुरते घालून ..आरश्यात पाहून परत मनात येईल तेव्हा ते कपडे काढून पुन्हा फक्त बर्म्युडा वर राही ..हे तिघेही कोणत्याही थेरेपीज करताना कधी दिसले नाहीत ..मी पाहिलेले दृश्य असे होते की..एका कोपर्यात भिंतीला टेकून योगेश आणि लौकिक बसलेले होते ..त्यांनी त्यांचे पाय पुढे पसरलेले होते ..त्यांच्या समोर बसून प्रकाश अतिशय प्रेमाने काही वेळ योगेशचे आणि काही वेळ लौकिकचे पाय दाबून देत होता .. मूकपणे हे पाय दाबून देण्या ..घेण्याचे काम चाललेले होते ..मला या प्रकारची गम्मत वाटली ..मी प्राणायाम संपल्यावर माँनीटरला हे तिचे कोणते व्यसन करतात ..असे विचारले तर म्हणाला.. हे दुर्दैवी लोक आहेत ..

योगेश जा जन्मतः मंदबुद्धी आहे ..लहानपणी वडिलांच्या ते लक्षात आले नाही ..मोठा होत गेला तसे हळू हळू ध्यानात आले ..त्याला मानसोपचार तज्ञांचे उपचार देण्याचा प्रयत्न झाला ..शाळेत पाठवून झाले ..जेमतेम आठवी पर्यंत शाळेत गेला ..याचे वैशिष्ट्य असे की याला तेलकट ..तुपकट पदार्थ ..मिठाई ..सामोसे..बटाटेवडे वैगरे खाण्याची प्रचंड आवड आहे ..घरी तो त्या साठी भांडून पैसे घेतो ..हॉटेल मध्ये जावून खावून येतो ..त्यामुळे वजन वाढले आहे याचे ..मोठा होत गेला तसा याचा त्रास वाढला ..हॉटेलात खायला पैसे दिले नाहीत तर .आरडा ओरडा ..शिवीगाळ करतो ..शेवटी वडिलांनी वैतातून याला काही दिवस मनोरुग्णालयात ठेवले ..मात्र फारसा बदल झाला नाही ..हा घरी फक्त चांगले चुंगले पदार्थ खाण्यासाठी मस्ती करतो ..म्हणून मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने याला इथे ठेवले गेले आहे .येथे त्याच्या खाण्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते .. मानसोपचार तज्ञांचा औषधांचा कोर्स संपला की हा जाईल घरी ..

दुसरा लौकिक हा १२ वी पर्यंत शिकलेला आहे ..बारावी पर्यंत सगळे सुरळीत होते ..अभ्यासात अतिशय हुशार होता ..परंतु बारावीत असताना याच्या हाती मोबाईल आणि संगणक आला ..हा जास्तीत जास्त वेळ मोबाईल वर चँटिंग तसेच नेटकँफेत जावून सर्फिंग यात वेळ घालवू लागला ..पुढे एक दिवशी काय झाले नक्की समजले नाही ..मात्र याचे डोके फिरले ..कॉलेजला जाणे बंद झाले ..घरात नुसता बसून राहू लागला ..कोणी आभ्यास ..कॉलेजचा विषय काढला की आक्रमक होई ..मानसोपचार तज्ञांचे उपचार यालाही सुरु आहेत ..मात्र अनेक दिवस दिवस झाले तरी याच्या वागण्यात फारसा बदल झालेला नाही ..कदाचित प्रेमभंग झाला असावा ..किवां जास्त वेळ नेट सर्फिंग तसेच चँटिंग करून याच्या मनावर ताण येवून हे असे झाले असावे ..मात्र हा माणसातून उठला …मानसोपचार तज्ञांची ओषधे घेवून हा शांत असतो एरवी खूप आरडाओरडा करत असतो ..

तिसरा प्रकाश हा देखील नववी पर्यंत सर्व साधारण मुलांसारखा होता ..बहुधा सायकलवरून पडल्याचे निमित्त झाले ..तेव्हा पासून हा असा विचित्र वागतो ..पँट व्यतिरिक्त अंगावरचे इतर कपडे काढून टाकतो ..केव्हाही घरातून असा उघडा बाहेर निघून जातो ..मनात येईल तेव्हा इतरांचे कपडे घालतो ..पुन्हा काढून ठेवतो ..कधी कधी घरातील सर्व कपडे एका सूटकेस मध्ये भरून गावाला जातो असे सांगून एकदोन दिवस गायब रहातो,..परत येताना सूटकेस कुठेतरी हरवून येतो ..या तिघांबाबत मला मिळालेली माहिती सुन्न करणारी होती ..या तिघांना मनोरुग्णालयात ठेवले पाहिजे ..इथे व्यसनमुक्ती केंद्रात यांना का ठेवले ? असा विचार माझ्या मनात आला ..माँनीटरला तसे विचारले ..तो म्हणाला हे तिघेही मध्यमवर्गीय आहेत ..आई वडिलांचे अतिशय प्रेम असते अशा मुलांवर ..यांचे आईवडील सरकारी मनोरुग्णालयात जावून पाहणी करून आले ..मात्र तिथले वातावरण पाहून त्यांना तिथे ठेवावे असे वाटले नाही आईवडिलांना ..

घरी हे तिघेही मानसोपचार तज्ञांनी दिलेल्या गोळ्या घेत नाहीत ..कशाला विरोध केला तर आरडा ओरडा करतात .. त्यांनी नियमित औषधे घ्यावीत या साठी त्यांना कुठेतरी शिस्तबद्ध वातावरणात ठेवण्याची गरज आहे ..बाहेर हे कुठेतरी निघून जातील ..रस्त्यावर भटकत राहतील .. रस्त्यावर फिरणाऱ्या ..ओळख हरवलेल्या ..केस अन दाढी वाढलेल्या ..फाटके कळकट कपडे घातलेल्या वेड्यांसारखी यांची अवस्था होईल ..मुंबई ..पुणे या भागात अशा लोकांना ठेवून घेणारी महागडी नर्सिंग होम आहेत ..मात्र तेथील खर्च यांच्या कुटुंबियांना परवडणारा नाही ..यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून सरांनी अतिशय अल्प खर्चात यांना येथे ठेवून घेतले आहे ..यांचा इथे फारसा त्रास नाही ..फक्त काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लगते ..

हे तिघेही इथे आक्रमक होत नाहीत कारण नियमित यांना औषधे दिली जातात ..तसेच सरांचा यांना हाताळण्याचा अभ्यास असल्याने हे आमचे आणि सरांचे ऐकतात ..गमतीने आम्ही यांना त्रिदेव म्हणतो .हे तिघेही वार्डातील इतर लोकांशी फारसे बोलत नाहीत ..मात्र एकमेकांची खूप काळजी घेतात ..कोणी यांच्या पैकी एकाला रागावले तर इतर दोघांना खूप राग येतो ..कदाचित यांना आपण तिघे व्यसनी नाही आहोत तर मनोरुग्ण आहोत हे जाणवले आहे..एकमेकांना धरून राहतात तिघे ..महिन्या पंधरा दिवसातून यांचे पालक यांना भेटायला येतात ..मात्र तिघेही पालकांशी फारसे बोलत नाहीत ..पालकांनी आणलेले खाण्याचे पदार्थ संपले की हे उठून येतात ..बिचारे पालक हे नक्की कधीतरी सुधारतील या आशेवर आहेत …त्यांचे कथा ऐकून मला वाटले की मी खूप सुदैवी आहे ..निसर्गाने मला चांगला निरोगी जन्माला घातले ..शिक्षण व इतर सर्व व्यवस्थित झाले ..मात्र मी केवळ दारूच्या आकर्षणामुळे माझे आयुष्य गुंतागुंतीचे करून ठेवले होते ..यांच्या वर तर निसर्गाने अन्याय केला होता ..

( बाकी पुढील भागात )

— तुषार पांडुरंग नातू

” मैत्री ‘ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
संपर्क..रवी पाध्ये – ९३७३१०६५२१ ..तुषार नातू – ९८५०३४५७८५

( ‘ बेवड्याची डायरी ” या लेखमालेत मी आमच्या ‘ मैत्री व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद ‘ नागपूर ..येथे कसे वातावरण असते ..काय काय घडते …कशा गमती जमती तसेच गंभीर घटना घडतात ..याबाबत लिहिले आहे ..ही लेखमला मागील वर्षी फेसबुकवर लिहिली होती ..मात्र ज्यांनी वाचली नसेल त्यांच्यासाठी पुन्हा ही लेखमाला येथे आज पासून टाकायला सुरवात करत आहे ..यातील विजय हे व्यसनी पात्र काल्पनिक आहे ..हा विजय आमच्या केंद्रात उपचारांना दाखल झाल्यावर काय काय होते ते त्याने इथे डायरीद्वारे सांगितलेय ..यातील माॅनीटर म्हणजे आमचा निवासी कार्यकर्ता आहे ..तर ‘ सर ‘ असा जो उल्लेख आहे तो …तुषार नातू व रवी पाध्ये या प्रमुख समुपदेशकांसाठी आहे याची दखल घ्यावी .)

तुषार पांडुरंग नातू
About तुषार पांडुरंग नातू 93 Articles
मी नागपुर येथे मैत्री व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी समुपदेशक म्हणून गेली १८ वर्षे कार्यरत असुन फेसबुकवर देखिल व्यसनमुक्तीपर लेखन करतो व्यसनमुक्ती या विषयावर माझी ३ पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यातले एक पुस्तक माझे स्वतचे आत्मकथन आहे . व्यसनमुक्ती व भावनिक संतुलन, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच सामाजिक समस्यांवर प्रबोधनपर लिखाण करतो

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..