भाळीचे भाग्य असावे
मृदुलस्पर्शी स्वर्गसुखाचे
अमृत प्रीतवात्सल्याचे
सौभाग्य सहृदी मित्रत्वाचे….
आयुष्याच्या वाटेवरती
दुःखातही सुखावणारे
आधाराचे हात देवूनी
कुणी असावे सावरणारे….
रमविणाऱ्या रम्यनिसर्गी
ऋतुरंगात भुलूनी जाता
मोहरल्या मिठित विरूनी
दिव्यस्पर्शात मिटुनी जावे….
जन्म, मृत्यु सत्यशाश्वती
हॄदयांतरी जपता भावप्रीती
सांजाळल्या क्षितिजावरती
जीवा लाभावी आत्मशांती….
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २५६
१२/१०/२०२
Leave a Reply