मुलगा म्हणाला बापाला
‘पप्पा,गुगलवर हवं ते मिळते,
जसं म्हणावं तस ते ऐकते’
मग तो म्हणाला, ‘ हे गुगल,
सिंग अ साँग फाॅर मी’
गुगलने लगेच गाणे म्हटले.
‘ओके ,व्हाट्स अबाऊट टुडे.’
आजचा दिनविशेष सांगितला
‘हे गुगल , शो टुडेज वेदर ‘
लगेच गुगलने
आजचे तापमान सांगितले.
बाप म्हणाला,
‘वाss बेटा, वाss!’
बरं बेटा आता
गुगलला हे म्हण की ,
‘गिव्ह मी वन भाकर अॅन्ड
गो अवर वावर ‘
मुलाने गुगलला म्हणताच
गुगल म्हणाले, ‘ साॅरी? ‘
— विठ्ठल जाधव
शिरूरकासार जि.बीड
सं.९४२१४४२९९५
Leave a Reply