नवीन लेखन...

भाकरी

भाकरीच्या पाठीवर     ठसे दिसती हातांचे

जातां तव्यावर भाजूनी    निशाण राहते कष्टांचे

एका भाकरीच्या पाठीं     हात कितीक गुंतले

कण कण देती ग्वाही      मन भरुनी कसे आले

उन्हां पावसात फिरे      शेतामधीं शेतकरी

टप् टप् घाम गाळी      उभी करितो जवारी

पोती पोती उचलूनी      वाहून नेई मजूर

दमछाक होऊनी ही      मिळत नाहीं पोटभर

ओवी म्हणत मुखानें       आई थापिते भाकरी

साऱ्यांच्या कष्टामध्यें    तिच्या मायेची भागीदारी

धरणीच्या पोटातून      जीवन रस येई वर

दुजासाठी जगा तुम्ही     बघा सांगते भाकर

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

1 Comment on भाकरी

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..