जीवन संघर्षाचे दुसरे नाव आहे असे आपण नेहमीच म्हणतो. आणि ते अगदी बरोबर पण आहे. मानवी जीवन अनेक प्रश्नाने गुंतलेले असते. प्रत्येक जीव कुठल्यातरी विचाराने त्रस्त झालेला असतो. कुणाला संपत्ती कशी सांभाळावी याची काळजी असते तर कुणाला, आजच्या सांजेला तरी पोटभर भाकर मिळावी अशी आशा असते.
भुकेने व्याकुळ होऊन रडणारे मुले बऱ्याचवेळा बस मधून पाहायला मिळतात.त्यांचे व्याजुळेले जीव चेहरा सोकलेले ,कासावीस झालेले जीव अनवाणी पायांनी इकडे तिकडे भुकेच्या शोधात फिरतात.गरीब असणे जणू गुन्हाच आहे आजच्या काळात.घरासमोरून गेलेच कुण्यातरी मोठ्या माणसांच्या त्यांनां हे लहाने चोर वाटतात.ते कधी खूपच त्रास देतात हे मुल म्हणून तेथून हाकलून लावले जाते.आलीच कुणा दया ते ते देतात शिळे अन्न जे त्यांनी खाल्ले तर तब्येत खराब व्हायची,पण ती गरीब मुलांसाठी ते शिळे अन्न फक्त जगण्याचं आधार असते.
एक मोठा माणूस उपाशी राहू शकत नाही तर ही लहान लहान जीव तरी कुठून आणतील हे बळ.कधी उदास होऊन रस्त्याच्या कडेला ,तर कधी उगाच आयुष्याचे दिवस काढण्यात देवाला हात जोडणे ,ते कधी भुकेने व्याकुळ होऊन लोकांसमोर हात जोडणारे हे पाखरे भुकेने एवढे व्याकुळ असतात. की त्यांना शिक्षण काय असत हे माहीत नसत.त्यांना दोन अक्षरे वाचता येत नसतील पण त्यांच्या कडे असलेले अनुभवाचे धडे हे कुण्याची मोठ्या डिग्री मिळवलेल्या पेक्षा जास्तच असतात.
आयुष्यात अश्या मुलांसाठी काहीतरी काम करा ज्यांना कोणी नाही. ज्याच्या आयुष्याचे शिक्षणाचे दिवस भाकरीचा तुकडा शोधण्यात निघून जात आहे. घरात असलेले अन्न फेकून न देता कुणाला द्या ज्यामुळे त्यांची भूक शांत होऊन मन तृप्त होईल. आपल्या अंगणात येणाऱ्या या लहान जीवाला चोर न समजता त्यांना शक्य होईल तेवढी मदत करा. इवले इवले हात जर कामाला लागले तर उद्याचे भविष्य काय असेल. त्यांना शिक्षणाने घडवण्याचा प्रयत्न करा भाकरीच्या शोधात हरवलेलं त्यांच्या आयुष्याला थोड आनंदाने परतून देण्याचा प्रयत्न करा.
— अॅड विशाखा समाधान बोरकर
पातूर जी अकोला
Leave a Reply