नदीकाठच्या कपारीमध्ये,
बेडूक बसला दबा धरूनी,
उडणाऱ्या माशीवरते,
लक्ष सारे केंद्रीत करूनी ।।१।।
नजीक येऊनी त्या माशीचे,
भक्ष त्याने करूनी टाकले,
परि दुर्दैव त्याचे बघा कसे,
सर्पानेही त्यास पकडले ।।२।।
बेडूक गिळूनी सर्प चालला,
हलके हलके वनामधूनी,
झेप मारूनी आकाशी नेले,
घारीने त्याला चोंचित धरूनी ।।३।।
‘भक्ष्य बनने’ दुजा करीता,
मृत्यूची ही चालते श्रृखंला,
जनक असता तोच सर्वांचा,
गमंत येई त्या खेळाला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply