भक्त हात जोडूनी उभा
कोण जाणे कोणता अवतार
शिव की कली दृष्टिभ्रम
दोन्हीं दिव्य परी समोर अंधार!!
अर्थ–
“ये दुनिया जैसी दिखती हैं, वैसी होती नहीं हैं”, ” दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं” वगैरे वगैरे म्हणी आपल्याकडे प्रचलित आहेत. पण त्याचा नेमका अर्थ काय हे माणसाला कधीच कळत नाही.
भगवंताने आपल्याला वाईट आणि चांगलं असं असतं हे सांगितलं पण काय वाईट आणि काय चांगलं हे मात्र त्याने आपल्यावर सोडलं आहे. आपण आयुष्यभर एखाद्याची स्तुती करतो, त्याच्या छत्र छायेखाली वावरतो, आपल्या मनात त्या व्यक्ती विषयी चांगले भाव, आदर असतो पण, उजेडात होते पुण्य, अंधारात पाप या वाक्याला आजच्या या कलियुगात जी दिव्यता प्राप्त झाली आहे त्याचे काय? नाण्याच्या दोन बाजू असतात, एकंच बाजू सतत दिसत राहिली आणि अचानक दुसरी बाजू कोणी समोर केली तरी आपल्याला ती बाजूही पहिल्या बाजू सारखीच दिसू लागते याला वरचष्मा असणे असे देखील म्हणतात.
देव माझा कोणता या पेक्षा कोणता देव कसा आहे यावर जर बोलायला गेलं तर माझ्यामते वादळ निर्माण होईल. समाजात ताईंचा कैवारी पण घरची मात्र बाई बिचारी, हे हात समोर जोडुन उभा असलेला कधी पाहू शकत नाही त्यामुळे सच कडवा होता हैं या म्हणीचा जन्म झाला.
कोणाची भक्ती करावी याला काही निकष नाहीत आणि असूही नयेत, पण जर कोणी त्याची दुसरी बाजू दाखवली तर ती समजून घेण्याची ताकद अंगी यावी एवढेच त्या भगवंताकडे मागणे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply