केल्याने देशाटन , पंडित मैत्री, सभेत संचार,
मनुजा, ज्ञान येतसे फार … ”
संत चरित्र वर्णन करताना संत महीपति यांनी संत कबीर यांच्या रचनांचा अभ्यास केला होता. तत्कालीन हिंदी भाषेला त्यांनी ‘हिंदुस्थानी’ संबोधले आहे व ती आपली ‘देशभाषा’ आहे असे वर्णन केले आहे. महाराज बहुभाषी होते,त्यांना मराठी,संस्कृत,हिंदी,कन्नड व इतर भारतीय भाषा यांचा परिचय होता. संत चरित्र लिखाण करण्या आधी भारतातील अनेक तीर्थ क्षेत्र त्यांनी पाया खाली घातले होते. त्यामुळे त्यांच्या चरित्र लिखाण हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक भाषेत पोहचले होते,याचे अनेक संदर्भ साहित्यात उपलब्ध आहेत.
ज्ञान प्राप्ति करीता पर्यटन व भारतीय संस्कृतिचे सखोल ज्ञान प्राप्त होण्यासाठी अनेक भाषा परिवारातील विद्वानांनाचे सान्निध्य आवश्यक असते हे महिपती महाराज यांनी जाणले होते. खरा सच्चा संत हा सर्व भाषेशी मैत्री ठेवतो. वर्तमान काळी सर्वांनी भाषा भेद, जातीभेद वर्ज्य केला तर ज्ञान, भक्ती,विकास होणार हे निश्चित आहे.
संदर्भ-
जे भक्त अवतरले पृथ्वीवरी ॥ तेचि कलियुगामाझारी ॥ प्रकट झाले तारक ॥१६॥ त्यांचीं चरित्रें वर्णावयास ॥ मज वाटला बहु उल्हास ॥ आतां श्रोते हो सावकाश ॥ द्यावें अवधान मजलागीं ॥१७॥ नेणें मी कांहीं चातुर्य व्युत्पत्ती ॥ नव्हें मज बहुश्रुत अध्यात्मग्रंथीं ॥ नेणें संस्कृतवाणी निश्चितीं ॥ श्रीरुक्मिणीपति जाणतसे ॥१८॥ मागें संतवरदानीं ॥ एकनाथ बोलिले रामायणीं ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥१९॥ नामदेवमुक्तेश्वरांनीं ॥ भारतीं वर्णिला चक्रपाणी ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२०॥ श्रीभागवतीं टीका वामनी ॥ हरिविजय केला श्रीधरांनीं ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२१॥ बोधराज रामदासांनीं ॥ गीतीं आळविला कैवल्यदानी ॥ तैसीं माझी प्रसादबोलणीं ॥ वरदवाणी नसे कीं ॥२२॥ गणेशनाथ केशवस्वामी ॥ साळ्या रसाळ प्रसिद्ध जनीं ॥ कबीर बोलिले हिंदुस्थानी ॥ देशभाषा आपुली ॥२३॥ ऐसे संत प्रेमळ जनीं ॥ ज्यांचे ग्रंथ ऐकतां श्रवणीं ॥ अज्ञानी होती अति ज्ञानी ॥ नवल करणी अद्भुत ॥२४॥
(संत महीपति कृत श्री भक्तिविजय ग्रंथ)
~ विजय प्रभाकर नगरकर (ताहाराबादकर)
उपयुक्त माहिती