प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचा जन्म २१ डिसेंबर १९०३ रोजी झाला.
आबासाहेब गरवारे यांना नक्कीच महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार म्हणून मानले जाते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.
१९७१ साली भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. शून्यातून उद्योग सुरू करून त्यांनी गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. त्यामुळे प्लॅस्टिक्स, नायलॉन ब्रिसल्स इ. गोष्टींची आयात बंद करता आली.
आज सुद्धा गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, या कंपन्या भारतातील अग्रगण्य मानल्या जातात.
मा.आबासाहेब गरवारे यांचे २ नोव्हेबर १९९० रोजी निधन झाले.
मा.आबासाहेब गरवारे यांना आपल्या समूहातर्फे यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply