आपल्याला बिस्मिल्ला खाँ यांच्या शहनाईचा आवाज रोज न चुकता रेडिओच्या सर्व केंद्रांवरून ‘मंगल प्रभात’मध्ये ऐकायला येतो. त्यांचा जन्म २१ मार्च १९१६ रोजी झाला.अजूनही मंगल कार्यात शहनाई वाजवणारे मिळाले नाहीत तर खानसाहेबांच्या वादनाची सीडी मिळवून वाजवली जाते. बज गई शहनाई, शादी अब होनेवाली है, असा संदेशा पोचविणा-या ह्या शहनाईला बिसमिल्ला खाँ यांनी पारंपारिक शास्त्रीय संगीताच्या मैफलीच्या मखमली गालीचावर नेऊन बसविले. १९३६-३७ सालच्या सुमारास बनारस येथे ‘स्टार हिंदुस्थान’ लेबलवर त्यांनी पहिली ध्वनिमुद्रण केली ती सगळी रागदारीची होती. बिहाग, भैरवी, तोडी, दुर्गा, बागेश्री व जोनपुरी असे राग असून लेबलवर ‘विलायतू बिस्मिल्ला ऑफ बनारस’ असं लिहिलं आहे. १९४१ मध्ये ग्रामोफोन कंपनीनं लखनौ येथे तीन ध्वनिमुद्रिका केल्या, त्यात तोडी व मालकंस राग तसेच ठुमरी व दादरा हे सुगम संगीताचे प्रकार आहेत. लेबलवर ‘बिस्मिल्लाह अॅ ण्ड पार्टी’ असं छापलं असून त्यावर ‘सनई गत’ असं लिहिलं आहे. ध्वनिमुद्रिकाप्रेमींच्या घरातून व सार्वजनिक उत्सव समारंभातून त्या रेकॉर्ड्स वाजवल्या जाऊ लागल्या. गुरूंचा रोष पत्करूनही सुगम संगीताच्या तीन मिनिटं वाजणाऱ्या रेकॉर्ड्स ते देतच राहिले. त्यांची लोकप्रियता पाहून जून १९५१ च्या दिल्लीतल्या ध्वनिमुद्रण सत्रात ‘बाबुल’ सिनेमातील दोन गाणी त्यांनी रेकॉर्ड केली- ‘छोडम् बाबुलका घर’ व ‘पंछी बनमे पिया पिया गाने लगा’. १९५७ पर्यंत रागदारी व सुगम संगीताच्या बरोबरीने ‘जीवन ज्योती’, ‘आवारा’, व ‘बसंत बहार’ सिनेमातली गाणी त्यांनी वाजवली. १९५९ च्या प्रकाश पिक्चर्सच्या ‘गूँज उठी शहनाई’ या बोलपटातल्या वादनानं तर खानसाहेबांना रसिकमनांत खास स्थान मिळवून दिलं. या बोलपटातील गाणी इतकी गाजली की ‘दिलका खिलौना हाये टूट गया’ व ‘जीवनमें पिया तेरा साथ रहे’ ही गाणी सनईवर वाजवून त्यांनी रेकॉर्डस केल्या. त्यात एकल वादन तर आहेच, पण उस्ताद अमीर खान साहेब यांच्या गायनाबरोबर जुगलबंदी व उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांच्या सतार वादनाबरोबरची जुगलबंदीही आहे. तसेच मा. व्ही.जी जोग जुगलबंदीही लोक अजून मेजवानी म्हणून ऐकतात. यांच्या बरोबरची पुढच्या काळात सतार, बासरी, सरोद जुगलबंदीची ही जणू मेजवानी होती. हिंदी चित्रपटसृष्टीतही शहनाईला श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले. सनई हे भारतीय वाद्य जगप्रसिद्ध करण्यात सनईवादक उस्ताद बिस्मिल्ला खान यांची महत्त्वाची भूमिका आहे. बिस्मिल्ला खान यांना संगीत-नाटक अकादमीची फेलो, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, तानसेन शासकीय पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. २००१ साली भारत सरकारने मा.बिस्मिल्ला खान यांना सर्वोच्च असा ‘भारतरत्न’ पुरस्कार बहाल करण्यात आला. मा.बिस्मिल्ला खान यांचे २१ ऑगस्ट २००६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट.
बिस्मिल्ला खान यांचे सनई वादन.
https://www.youtube.com/watch?v=4CjQ3X6OtsI
NICE INFORMATION, THANKS