देशाला १९४७ साली स्वातंत्र्यता मिळाली खरी पण त्यानंतरही देशात सुराज्य स्थापित करणयासाठी अनेक सामाजिक प्रकल्प तडीस न्यायचे होते, बरीच समाजकल्याणचे तसेच देश उत्तनीतीचे भरपूर मोठे काम बाकी होते. काही स्वातंत्रता सेनानींनी प्राणांची आहुती दिली तर काहींनी स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्रयोत्तर काळात सुद्धा सतत कामं केलीत. त्याचेच फलित आज आपला देश जगद्गुरू होण्याच्या मार्गावर आहे.
ओडिशा च्या ‘मदर तेसेसा’ असे ज्यांना संबोधित केले जाते अश्या पार्वती गिरी.
१९ जानेवारी १९२६ साली ओडिशा श्री धनंजय गिरी ह्याच्या घरी पार्वती देवींचा जन्म झाला. त्यांचे वडील तसेच काका रामचंद्र गिरी सुद्धा स्वातंत्रता सेनानी होते.
त्यांच्या घरात काँग्रेसच्या, स्वातंत्र्य सेनानींच्या बैठका होतं असत. लहान वयातच पार्वती गिरी ह्या सगळ्या चर्चांचा हिस्सा बनल्या. त्यांचे विचार तयार होण्याच्या काळातच त्यांचवर देशसेवेचे संस्कार अगदी सहज होत होते. वयाच्या ११ व्या वर्षी म्हणूनच त्या निर्णय घेऊ शकल्या, त्यांनी शाळेला राम राम ठोकला आणि काँग्रेस कार्यकर्ती म्हणून स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. त्या खेड्या-पड्यातून प्रवास करायच्या, लोकांमध्ये स्वातंत्र्याच्या भावना जागृत करायच्या. देशाच्या कान्या-कोपऱ्यात कसे हे समर पेट घेते आहे हे सगळ्यांना जीव तोडून सांगत होत्या. स्वदेशी म्हणजेच खादीचा वापर, प्रचार आणि प्रसार केला. गावागावातून चरखा चालविण्याचे, सूत कातण्याचे प्रशिक्षण दिले. आपण गुलामगिरीत जगतोय ह्याची जाणीव जनमानसाला करून द्याययचे काम पार्वती गिरी ह्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी सुरू केलं. काय ती विचारांची प्रगल्भता म्हणायची…
त्यांचे कार्याप्रतिचे समर्पण, तन्मयता बघून वरिष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या वडिलांशी आणि काकांशी बोलणे केले, त्यांना पूर्णवेळ काँग्रेस कार्यकर्ती म्हणून रचनेत घेतले. आता पार्वती गिरी स्वातंत्र्य चळवळीसाठी आसपासच्या भागात प्रवास करू लागल्या. चले जाव आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविल्या मुळे त्यांना २ वर्ष सश्रम कारावास झाला. या खटल्याच्या वेळीसुद्धा त्यांनी कोर्टात उपस्थित वकिलांना न्यायालयीन व्यवस्थेचा बहिष्कार करायला सांगितला, कारण तो परकीयांच्या अधिपत्याखाली होता. परिणामी कारावास नक्कीच होता आणि तो झालाही. पण म्हणतात ना की प्रत्येक घटनेला एक संधी म्हणून बघायला हवं, पार्वती गिरी ह्यांनी तेच केले. कारावास म्हणजे देशसेवेची, समाजसेवेची संधी हुकणार असे न समजता कारावासात सुद्धा महिलांशी संपर्कात राहणे, त्यांना एकजूट करणे,स्वातंत्र्य संग्रामची ओळख करून देणे असे त्या करतच राहिल्या. निडर स्वभावच्या पार्वती गिरी कधीही, कुठेही मागे हटल्या नाहीत, मग ते कुठलेही काम असो.
स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी आधी आपले शिक्षण पूर्ण केले त्याचबरोबर स्वखुशीने घेतलेली सामाजिक जबवाबदरी आनंदाने पार करत राहिल्या. आता समाजसेवा त्यांच्या जगण्याचाच एक भाग बनला होता. स्त्रियांच्या उद्धारासाठी त्या आजीवन झटल्या. त्यांनी कस्तुरबा गांधी मातृनिकेतन आणि डॉ संत्रा बाल निकेतन अशा संस्था स्थापन केल्या. ह्या संस्थामार्फत त्या महिला आणि अनाथांसाठी काम करत राहिल्या. कारावासांची स्थिती सुधारावी, त्याचबरोबर कुष्ठ रोग निवारण ह्या साठी सुद्धा त्यांनी स्वतःचे रक्ताचे पाणी केले आणि मोठे कार्य ओडिशा भागात उभे केले.
त्यांच्या कामाचा आवाका बघूनच त्यांना ओडिशा च्या मदर तेसेसा हा खिताब लोकांनी स्वतःहून बहाल केला. १९८४ साली त्यांनी केलेल्या कामाची वाखाणणी department of social welfare तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. आजीवन समाजसेवेचा घेतलेला वसा उत्कृष्टपणे निभावून नेणाऱ्या पार्वती गिरीनां १७ ऑगस्ट १९९५ साली प्रदीर्घ आजारा नंतर देवाज्ञा झाली. या भारतमातेच्या वीरांगनेला माझे कोटी कोटी प्रणाम.
|| वंदे मातरम् ||
— सोनाली तेलंग.
१५/०७/२०२२.
संदर्भ:
१.indianculture.gov.in
२.magzines.odisha.gov.in
http://xn--g4b.wikipedia.org/
Leave a Reply