नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – ४४ – अम्मू स्वामीनाथन

त्या केवळ मृणालिनी साराभाई किव्हा कॅप्टन लक्ष्मी सहगल ह्यांच्या आई नव्हत्या, किव्हा सुब्बराम स्वामीनाथन मद्रासचे यशस्वी वकीलपत्नी एवढीच त्यांची ओळख नव्हती, लग्न होईपर्यंत धड शिक्षण न मिळालेल्या अम्मू स्वामीनाथन होत्या,भारतीय घटना समितीच्या सदस्या, त्या होत्या गांधीजींच्या अनुयायी, त्या होत्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामतल्या वीरांगना.

१८९४ साली पल्लकड तालुक्यात केरळ येथे एका नायर परिवारात झाला. वडिलांचे छत्र लहानपणीच गेले, अम्मू नी आपल्या आईला आयुष्यभर कष्ट उपसतांनाच पाहिले. शिक्षण मुलींना नाहीच, तरीही घरात एक शिक्षक येऊन मल्याळम भाषेत थोडंफार शिकवून जायचा, तेवढीच त्यांची शिक्षणाशी तोंड ओळख. पुढचं ही चित्र अगदी ठरलेलं,वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह आपल्यापेक्षा वयाने २० वर्ष मोठ्या असलेल्या श्री सुब्बाराम स्वामीनाथन मद्रास चे प्रसिद्ध वकील ह्यांच्याशी झाला. इथपर्यत अगदी चाकोरीबद्ध आयुष्य जगलेल्या अम्मूचं आयुष्य मात्र इथून पूर्ण कलाटणी घेणार होत. श्री सुब्बाराम ह्यांनी अमुंचे शिक्षण पूर्ण केले कारण लग्नाच्या वेळी अम्मू ने आपल्या आईला सांगितले होते की लग्न केले तर मोठ्या शहरात राहीन आणि शिक्षण पूर्ण करेन. अम्मू चे शिक्षण पूर्ण झाले, शिक्षणाचा खरा उपयोग त्यांनी स्वतःला फार छान घडविण्यात केला, आलेल्या संधीचा योग्य फायदा. आपल्या स्वतःला घडवतांना त्यांनी त्यांच्या मुलींना सुद्धा स्वतंत्र विचार करायला शिकवले.

गांधींच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर फार दिसून आला. कमलादेवी चटोपाध्याय, ऍनी बेसेंट, ह्या सगळ्यांबरोबर त्या मद्रास मध्ये विविध उपक्रम राबवित होत्या. ह्या सगळ्यांच्या प्रयत्नाने Women’s India Association, मद्रास येथे आकारास आली ज्या अंतर्गत भारतीय महिलांच्या समस्यांवर खूप मोठे काम सुरू झाले, जसे की बाल विवाह रोकणे, स्त्री शिक्षण, देवदासी प्रथा, परदा प्रथा मोडून काढणे इत्यादी. स्वातंत्रता संग्रामात सुद्धा त्यांची कारकीर्द उल्लेखनीय होती. भारत छोडो आंदोलना नंतर त्यांनी १ वर्ष सश्रम कारावास देखील भोगला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्या सतत समाज उद्धारासाठी काम करीत राहिल्या. भारतीय संविधान घटनेच्या त्या सदस्य होत्या. त्यांची मते त्यांनी प्रखरपणे मांडली मग त्या डॉ आंबेडकरांसमोर बोलत असो वा इतर कोणी. एका चर्चेत त्या बोलल्या होत्या,’भारताबाहेर नेहमीच असे म्हंटले जाते की भारतात स्त्रियांना समान हक्क नाहीये, पण आता जेव्हा त्यांना कळेल की आपण आपले संविधान स्वतःच तयार करत आहोत आणि त्यात स्त्रिया सुद्धा समाविष्ट आहेत तर त्यांचे मत नक्कीच बदलेल’. जातीय वादा विरुद्ध त्या कायम उभ्या राहिल्या. त्यांना मुळातच जातीयवादाची चीड होती. १९६० ते ६५ पाच वर्षे त्यांनी स्काउट्स आणि गाईड्स चे अध्यक्षपद भूषविले. त्याचबरोबर वेग-वेगळ्या समाजिक आणि संस्कृतीत संस्थांशी त्या संलग्न होत्या.

४ जुलै १९७८ साली वयाच्या ८४व्या वर्षी अम्मू ह्यांची जीवनज्योत मालवली. आपल्या प्रखर व्यक्तिमत्वाचा उपयोग समाज सेवेसाठी, समाजात योग्य बदल घडवून आणण्यासाठी करणाऱ्या अम्मू स्वामीनाथन ह्या भारतमातेच्या विरंगनेला माझे कोटी कोटी प्रणाम.

|| वंदे मातरम् ||

— सोनाली तेलंग.

१७/०७/२०२२.

संदर्भ:

http://constitutionofindia.net/

२.article in indianexpress

http://bharatdiscovery.org/

http://wikipedia.com/

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 60 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..