नवीन लेखन...

भारतरत्न – देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान

Bharatratna - The Highest Honour of India

भारतरत्न हा देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान असून जीवनच्या कुठल्याही क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी तो दिला जातो. १९५४ मध्ये हा सन्मान सुरू झाला.

वंश, व्यवसाय, लिंगभाव यावर आधारित भेदभावाशिवाय तो पात्र व्यक्तीस दिला जातो. पंतप्रधान भाररत्नसाठी व्यक्तींच्या नावाची शिफारस करतात. इतर औपचारिक शिफारशींची गरज नसते. एका वर्षांत तीन जणांना भारतरत्न देता येते.

भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला सनद (प्रमाणपत्र) व पदक दिले जाते. राज्यघटनेच्या कलम १८ (१) अनुसार पुरस्कार हा नावापुढे किंवा मागे लावता येत नाही. बायोडाटामध्ये मात्र भारतरत्न उल्लेख केला जाऊ शकतो. लेटरहेड किंवा व्हिजिटिंग कार्डमध्ये त्याचा उल्लेख करता येतो.

भारतरत्न सन्मान राष्ट्रपती प्रदान करतात.

भारतरत्ने:

सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४). सी. राजगोपालाचारी (१९५४), सी.व्ही.रमण (१९५४), भगवान दास (१९५५), मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या (१९५५), जवाहरलाल नेहरू (१९५५). गोविंदवल्लभ पंत (१९५७), धोंडो केशव कर्वे (१९५८), बिधानचंद्र रॉय (१९६१), पुरुषोत्तम दास टंडन ( १९६१), डॉ. राजेंद्र प्रसाद (१९६२), डॉ. झाकीर हुसेन (१९६३), पांडुरंग वामन काणे (१९६३), लालबहादूर शास्त्री (१९६६), इंदिरा गांधी ( १९७१), व्ही.व्ही. गिरी (१९७५), के.कामराज (१९७६), मदर तेरेसा (१९८०), आचार्य विनोबा भावे (१९८३), खान अब्दुल गफार खान (१९८७), एम.जी.रामचंद्रन (१९८८), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९९०), नेल्सन मंडेला (१९९०), राजीव गांधी (१९९१), सरदार वल्लभभाई पटेल ( १९९१), मोराररजी देसाई (१९९१), अबुल कलाम आझाद (१९९२), जे.आर. डी.टाटा (१९९२), सत्यजित रे (१९९२), एपीजे अब्दुल कलाम (१९९७), गुलझारीलाल नंदा (१९९७), अरुणा असफ अली (१९९७), एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८), चिदंबरम सुब्रह्मण्यम (१९९८), जयप्रकाश नारायण (१९९८), अमर्त्य सेन (१९९९), , गोपीनाथ बोरडोलोई (१९९९), लता मंगेशकर (२००१), बिस्मिल्ला खान (२००१), भीमसेन जोशी (२००८), सी.एन.आर.राव (२०१३), सचिन तेंडुलकर (२०१३), अटलबिहारी वाजपेयी (२०१४), मदनमोहन मालवीय (२०१४)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..