भारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. साहित्य, कला, विज्ञान, सार्वजनिक सेवा इत्यादी विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणार्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन गौरविले जाते. १९५४ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. आजवर विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी बजावणार्या भारतीयांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९८७ साली पाकिस्तानातील नेते खान अब्दुल गफारखान उर्फ सरहद गांधी व १९९० साली दक्षिण अफ्रिकेतील गांधीवादी नेते डॉ. नेल्सन मंडेला या अभारतीय नेत्यांनाही या पुरस्काराने गौरविण्यात आले. देशातील सर्वोच्च असलेल्या या पुरस्कारावर आजवर ७ महाराष्ट्रीयन माणसांनी आपले नाव कोरले आहे. आपल्या असामान्य कर्तृत्वाने महाराष्ट्राची पताका दूरवर फडकविणार्या या रत्नांचा परिचय करुन दिला आहे किरण केंद्रे यांनी …….
—
Leave a Reply