भाषा जिला गौरवते,
त्या मातीचेच गान ,
मातेहूनही ती मोठी,
भाषा देत असे अधिक वेलांटी,–!
ती आहे सृजनांत ,
सर्वांची काळी आई,
तिच्या कुशीतून जन्म घेतो,
आपण सारे, पक्षी, प्राणी, –!
ती करते जसे संगोपन,
जिवांचे नित्य जतन,
म्हणूनच तिला रोज करावा,
नेमाने आपण प्रणाम,—!
काय तिची महती वर्णावी, कणातही आहे सत्व,
जीवनातील संजीवनी,
तिच्याविना सृष्टी निर्जीव,–!
जोडीदार आभाळाची,
विशाल त्यांचा संसार
लेकुरे उदंड जाहली,
गोकुळ सगळा परिवार,–!
माती पोटी जन्मते बीज,
आणि विशाल वृक्ष होती,
कित्येक वर्षानंतर पुन्हा बिजे,
हीच बिजे मातीत रुजती,–!
फळे-फुले रसरशीत,
कधी पिकून पडती,
त्यातूनच पुन्हा जन्मती
मातीतून परत वरती,–!
मानवी शरीर पार्थिव,
मातीतच शेवट अंत,
तिच्यातून असे जन्म,
तिच्यात एकरूप परत,—!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply