भास्करा दिन कालचा काळा, प्रेमास फुलत्या तुझ्या माझ्या,
मध्यभागात येऊन जसा,
चंद्रमाने आणला अडथळा ,–!!!
काही काळ दर्शना तुझ्या,
जीव कासावीस माझा,
कोलाहल माजतां उरां,
नुरला कुठलाही आसरा,–!!!
न्यारी प्रेमाची खुमारी,
चंद्राने अशी वाढवतां,—
स्वर्ग दोन बोटे राहिला ,
जशी ग्रहणाची सांगता,–!!!
मात देत सकल अंधारा,
उगवशील माझ्या राजा,
जरी तु होशी झाकोळतां,
उणीव नाही तुझ्या तेजां,–!!!
तारे वारे आणि चंद्रा,
सांगते रे मी कितीकदा,
सूर्यदेवाची करते पूजा,
तो एकमेव माझा त्राता,–!!!
चांद मध्ये असा डोकावतां,
खळबळ तनामनां,माजतां, दिनकराच्या किरणा तरसतां,— आधार सहस्रबाहुंचा मला,–!!!
काय वर्णू त्याचा महिमा,
माझ्या राजाच्या वेगळ्या थाटां,
न कोणी धजावे लावण्यां, हाता,
महाराणी शोभे सम्राटां,–!
ग्रहण येवो काही अथवा,
फिकिर नाही मजला,
प्रियकर एवढा तेजाळतां,
अंधाराचीही नाही तमा,–!!!
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply