बालपणीची मैत्रीण माझी
भातुकलीतील ती सवंगडी
निरागस तो खेळ आगळा
मी राजा, ती राणी भाबडी ।।
कितीतरी हा काळ हरवला
पण आज तीच राणी मनी
ती दूर, दूर तर मी हा इथे
आठवण, तिची नित्य मनी ।।
मला वाटते, भेटावे तिजला
अन बोलावे सारे गुज मनीचे
जे घडले ते आता घडुनी गेले
पुनर्जन्मी! खेळ खेळू मनीचे
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २४.
२४ – १ – २०२२.
bhatukalichya khela madhali raja anik rani – he gane kona Rajachya jeevanashi sambandhit aahe ka ? aasel tar krupaya ganyachi back ground katha sangavi hi vinanti.