आकाशाला शब्द भिडले,
हृदयामधले ।
भाव मनीचे चेतविता,
स्फोटक बनले ।।१।।
देह जपतो हृदयाला,
सदा सर्व काळी ।
धडकन त्या हृदयाची,
असे आगळी ।।२।।
जमे भावना हलके तेथे,
एकवटूनी ।
सुरंग लागता तीच येई,
उफाळूनी ।।३।।
कंठ दाटता
जीव गुदमरे आत ।
रंग बदलती चेहऱ्यावरले,
काही क्षणात ।।४।।
उद्वेग बघूनी शरीर,
कंपीत होते ।
हृदयातील भाव जाऊनी,
मन हलके होते ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply