देवाने दिली आपणास बाळे जुळी दोन,
पाठीला पाठ लाऊन जन्मास आली
जणू एकाच नाण्याच्या बाजू दोन !
एक बहिण आणि एक भाऊ
नामकरण करती त्यांचे तृप्ती आणि समाधान !
जुळ्यांना समजावून घेतना होते मनाची कसरत,
मीमी तूतू ने गाडी नाही पुढे सरकत !
प्रेम करता एकावर रुसवे दुसरे उगाच,
दुसऱ्यास जवळ घेता पहिले पाहे रागेच !
हरवली तृप्ती मनाच्या घरातून,
बुद्धीम्हणे जुळी खेळताहेत लपंडाव रत्यातून !
जुळ्या भावंडांचे एकमेकावर निस्सीम प्रेम,
समजण्यात भेदाभेद त्यांचे आपल्यावरील प्रेम !
देवास साक्षी ठेऊन सुधारू आपले विचार,
अंतर्मुख होऊन सारू कुतर्क दूर !
जगदीश पटवर्धन, दादर
Leave a Reply