भविष्यात ‘पाणी’ अमृत ठरणार आहे,
मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे !
आतापासूनच तरतूद करून ठेवावी लागणार आहे,
रेन वॉटर हार्वेस्टिंग उपयोगी पडणार आहे !
शेतकऱ्यांच्या आत्महत्या पॅकेजने सुटतील?
समस्येच्या मुळाशी जाऊन सोडवाव्या लागतील !
कदाचित जलशिवार आणि नद्या जोडणीने
शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या सुटील !
अवर्षणग्रस्तांना ‘अमृता’चे आमिष दाखविले,
बिचारे ‘जलाचे’ दोनथेंब पिऊन जगले !
‘अमृत’ प्राशनाने अमरत्व मिळतं म्हणतात,
‘अमृता’ ऐवजी नशिबी दगडगोटेच आले !
बळीराजा सगळ्या बाजूने गांजला आहे,
अमुतापेक्षा विषाला जवळ करत आहे !
बळीराजाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
वसुंधरेवरील जालामृतात आहे !
वसुंधरेवर पहिले ‘अमृत’ सिंचन
परमेश्वराने केले !
सागराच्या पाण्याचे ढगात रुपपांतर करून
वसुंधरेवर सर्वत्र ‘अमृत’ बरसले !
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply