शब्दातुनी उमललो
शब्दासंगे रांगलो
खेळलो बागडलो
शब्दातुनी नाहलो…
स्पर्शता शब्दभावनां
अंतरातुनी दंगदंगलो
शब्दाशब्दांचा अर्थ
उलगडित राहिलो..
शब्दांचेच ब्रह्मांड
मी वेचित राहिलो
गुच्छय संवेदनांचे
मी माळीत राहिलो…
शब्दशब्द संजीवनी
प्रीतवात्सल्य प्राशिलो
भावशब्दात पावित्र्य
निष्पाप व्यक्त जाहलो…
जाणुनी शब्दार्थ सारे
अंतर्मुख होत राहिलो
शब्द कृतार्थी, सांत्वनी
गीतात गुंफित राहिलो…
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २८५
४/११/२०२२
Leave a Reply