भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले,
करण्यास तव जवळीक, कामास तेच आले ।।१।।
जिंकून घेई राधा तुजला, उत्कठ करुनी प्रेम,
उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म ।।२।।
भक्तीभावाची करीता बात, ती तर असे आगळी,
पावन करण्या धाऊन जाती, सर्व संत मंडळी ।।३।।
भजनांत मिरा रंगली, ध्यास तुझा घेऊन,
नाचत गांत राहिली, केले तुज पावन ।।४।।
दया क्षमा शांतीचे भाव, करुणेमध्ये भरलेले,
त्यांत शोधता तुझा ठाव, आनंदी मन झाले ।।५।।
सर्वस्व तुजला अर्पिता, पावन होतो भक्तासी,
भावनेची ज्योत पेटतां, कदर तूच करीसी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply