आले कोवळे किरण कांचनी
चराचर सारे , सुखात नाहले…
भावनांच्या कळ्या उमलल्या
अधरी शब्दलाघव ते प्रसवले…
रिमझिमणाऱ्या, श्रावणधारी
कृष्णमेघ सावळे बरसबरसले
हिरवळलेल्या या तृणांकुरातून
चैतन्य जीवा तोषवित राहिले…
लागताच चाहुल विश्वंभराची
रूप ब्रह्मांडाचेही भारावुन गेले…
झरझरता श्रावण आत्मरंगला
स्वर शब्दमार्दवी दाटुनी आले…
व्याकुळता, अंतरीची निरागस
मन दिगंतरी सारे भावुक झाले…
–वि.ग.सातपुते .(भावकवी)
9766544908
रचना क्र. १८७
४/८/२०२२
Leave a Reply