भय नाही, क्रोध नाही
सय्यम असे साथीला
संकट काळी, परिक्षे वेळी
मंत्र घ्यावा लागला
नको विसंगती नको कीर्ती
नको हव्यास पूर्णत्वाचा
सर्वांचीच तैल बुद्धी
तो क्षण महत्वाचा…
अर्थ–
भय नाही, क्रोध नाही
सय्यम असे साथीला
संकट काळी, परिक्षे वेळी
मंत्र घ्यावा लागला
(वर्ष भर खेळायचं, हुंदडायच, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभाग घ्यायचा आणि सरते शेवटी परीक्षेच्या वेळी मात्र मनात भीतीने घर करायचं कारण अभ्यास झालेला नसतो. आता हे चित्र बदलायला लागलंय पण अजूनही पूर्णपणे मिटलेले नाही त्यामुळे आता परीक्षा सुरू होतायत तेव्हा आपल्या मुलाला किंवा मुलीला लिमिट पेक्षा जास्त फोर्स करू नका अभ्यासासाठी. प्रत्येकजण आपापल्या कुवतेनुसार अभ्यास करतोच. त्याला विश्वास द्या, सय्यम दाखवा त्याने जास्त चांगला फरक पडेल.)
नको विसंगती नको कीर्ती
नको हव्यास पूर्णत्वाचा
सर्वांचीच तैल बुद्धी
तो क्षण महत्वाचा…
(जे आवडीचं नाही ते करून प्रसिद्ध होण्यात काय अर्थ? ह्या क्षेत्राला खूप मागणी आहे, त्या क्षेत्रात जास्त कमाई होते म्हणून ते शिकायचे का?
त्या पेक्षा जे आवडते, जे करावेसे वाटते, जे मनापासून जमते ते करावे. नक्कीच त्यात आपोआप यश मिळेल आणि मग प्रसिद्धी तर न मागता सुद्धा होईल. प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे हा अट्टाहास करण्यापेक्षा जे करायचे ते पूर्ण केले की जास्त समाधान मिळते. ढ कोणी नसतो.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply