आघात जीवघेणे किती सहावे..
सारे सारे , मूक गिळूनी पहावे..
जीवा न काहीच संवेदना उरावी..
श्वासही सारेच , विकलांग व्हावे..
हवीत कशाला नाती ऋणानुबंधी..
ज्यांच्या विरहात शोकाकुल व्हावे..
जर जन्माचाच शेवट मृत्यू आहे..
तर उगा कुणात कां गुंतुनी रहावे..
प्रेम , वात्सल्य ,लळा , जिव्हाळा..
जर हे अळवावरचे पाणी असावे..
तर नकोच भावप्रीतीचा ओलावा..
पाषाणासम जीवन निर्जीव व्हावे..
आज नाही , कुणाचाही भरवसा..
क्षणक्षण जीवाने कासावीस व्हावे..
सभोवार , गुदमरलेले श्वास हतबल..
सांगा , आज जीवाने कसे सावरावे..
कलियुगाचे हे , वास्तव भयानक..
ब्रह्मांड देखील सारे अस्वस्थ व्हावे..
नकोनकोसे ,होते निःशब्द जीवन..
सत्य ! आज दुसरे कोणते असावे..
©️ वि.ग.सातपुते (भावकवी)
( 9766544908)
रचना क्र. ५७ / २४ /४/२०२१
Leave a Reply