भेट तुझी-माझी…..
बरसती श्रावणधारा
बेधुंद वाहतो वारा
पडती सुखनैव गारा
प्रेमरंगी रंगतो इंद्रधनु न्यारा
भेट तुझी-माझी……
खळखळता गोड झरा
अंगावर रोमांचित शहारा
फुलतो मोर पिसारा
सुगंधी फुलांचा फुलोरा
भेट तुझी-माझी……
हिरवा निसर्ग सारा
उभा राही जोडूनी दोन्ही करा
स्मरावा गत आठवांचा पसारा
प्रेमगंधी गंधाळावा आसमंत खरा
भेट तुझी-माझी…..
पाहताच तुला सामोरा
उधान येई मनमोरा
लोचनी चमकती अश्रूधारा
स्पर्शाने होई मी-तु बावरा
भेट तुझी-माझी…..
घडते अशी जशी वीणा झंकारावी
बोलात कविता जुळावी
प्रेमगीते मधूर गुणगुणावी
इंद्रधनुसंगे ती खुलावी
भेट तुझी-माझी……
मन तृप्त होई काठोकाठ
आनंदतरंगाचे वाहती पाट
सहवासाच्या सोबतीने दरवळते वाट
हातात हात घेऊनच उजाडते नवी पहाट
—–शुभांगी दळवी
Leave a Reply