प्रीये, सखे मनस्वामीनी
ये नां, सत्वरी सांजवेळी
नको नां, आता प्रतीक्षा
भेट नां, सत्वरी सांजवेळी।।
गोधुळीची धूळ गोकुळी
जित्राबांचे, ठसे गोखुरी
छुमछुम नादती घुंगराळे
भेट नां, राधिके सांजवेळी।।
सावळबाधा तूंच सावळी
ब्रम्हांडी! तुझी पडछाया
पावरीची, रुणझुण कंठी
नेत्री घन:श्याम सांजवेळी।।
वृंदावनी तेवते दीपज्योती
वैखरी, झरते शुभंकरोती
तूच मूर्त, प्रसन्न मनगाभारी
भेट नां, राधिके सांजवेळी।।
अस्ताचलीच्या, वेदिवरती
नयनमनोहर, अस्त केशरी
सोहळा हाच मनमिलनाचा
भेट नां, राधिके सांजवेळी।।
भेट नां गे राधिके सांजवेळी
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. २९.
२९ – १ – २०२२.
Leave a Reply