भेटीची आस तुझ्या,
नित्य मज छळते ,
तुझ्यासाठी सखया,
रात्रंदिन मी झुरते,–!!!
चित्र पाहूनी तुझे,
जिवाची ओढ लागते, जन्मोजन्मीचे नाते असता,
कशी हुरहुर वाढते,–!!!
थेट अंतरातुनी मला,
जसे तुझे बोलावणे,
घालमेल होता जीवा,
आतल्या आत लपवते,–!!!
जेव्हा कल्पते एकांता,
माझी न मी राहते,
तुझ्यासंगे भान हरपता, वास्तवालाच मी विसरते,–!!!
मनाचा हा ओढा,
कसाबसा रे दडवते,
आतल्या आत प्रवास सारा,
आत्मिक करून टाकते,–!!!
जीवांचे हे मैत्र राहता,
हातात जणू काही नसते,
तुजविण जीवनाचा साऱ्या
डांव, ना कधी मांडते,–!!!
तुला वाटतां मला वाटतां,
अंतर आपल्यात केवढे,
दोन समांतर रेषा,
एकजीव होणे नसते,–!!!
अशक्याची ना पर्वा,
ना कुठलेही देणे-घेणे,
कशी टाळावी एकरूपता,
प्रश्न किती जीवघेणे ,–???
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply