भूल देऊनी करता क्रिया
जाण न होते जगण्यात
भुलू नये काय घडले मागे
काय दिव्य झाले पश्चात
पावले पडती सुबक नक्षी ती
उठे मुखी सागरात
झरझर वारा मिटवूनी जातो
तिला ही क्षणार्धात….
अर्थ–
भूल देऊनी करता क्रिया,जाण न होते जगण्यात
(नशेच्या, व्यसनांच्या आहारी जाऊन केलेली कामे त्यांचे दुष्परिणाम लक्षात रहात नाहीत.)
भुलू नये काय घडले मागे,काय दिव्य झाले पश्चात
(पण ती जेव्हा इतिहास बनून येतात तेव्हा मात्र आपण काय केले याची प्रचिती आपल्याला सतत धडा शिकवत रहाते.)
पावले पडती सुबक नक्षी ती, उठे मुखी सागरात
(आठवणी साठवाव्यात आपल्या मनात, त्यांना चव्हाट्यावर आणू नये,जगासमोर सोसलेलं दुःख मांडून त्यातून काही मिळत नाही.)
झरझर वारा मिटवूनी जातो, तिला ही क्षणार्धात.
(जशी एखाद्या गोष्टीची हवा तयार होते, पण कालांतराने ती गोष्ट विस्मरणी जाते, तसेच आपण यशाच्या शिखरावर असताना हवेत उडू नये, वारा पडला की पक्षांनाही नमत घ्यावं लागतं.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply