मुळात ‘नगरसेवक’ व त्यांच्या ‘ निवडणुका ‘ हा एक ह्या काळातील भ्रष्टचाराचा एक मूळ उगम आहे व त्या आता रद्दबदल करूनच हा भ्रष्ट राजमार्ग कायमचा बंद करणे हीच ह्या काळाची गरज आहे. एक सांगा ह्या ऑनलाईन च्या काळात आपल्या नगरीत हा नगरसेवक हवाच कशाला ? जर सगळ्या महापालिका वॉर्ड कार्यालयांनी आपल सगळा कारभार पारदर्शक ठेवून आपली सगळी टेंडर्स, प्रोजेक्ट्स माहिती व जनसंपर्क अधिकाराखाली जनतेला खुली करून आपल्या सर्व कामाचा तपशील वेळोवेळी प्रसिद्ध केला तर ह्या नगरसेवकांची अजिबातच गरजच नाही.
प्रत्येक नागरिक हा नगरसेवकाच्या भूमिकेतून आपल्या वॉर्ड मधील चालू असलेल्या, होऊ घातलेल्या कामांचा तपशील अभ्यासून त्यावर उपयुक्त सूचना केल्या तर ह्या भ्रष्ट नगरसेवकांची गरजच काय ! प्रत्यके पालिका शसनाने ऑनलाईन कॉल सेंटर प्रस्थापित करून त्याद्वारे नागरिकांच्या समस्यां,सूचना दाखल करून त्यावरील पुढील कार्यवाहीची जबाबदारी घेतली व तसेच प्रत्येक रहिवासी कार्यकारी मंडळे पालिकेतील कारभारात अधिकृतपणे सहभाग घेवुन आपआपल्या समस्यां/सूचना मांडुन त्यान्चा पाठ्पुरावा केला तर नागरिकान्च्या मताची पोळी खाऊन वर त्यावर मिळालेल्या सत्तेचे तूप ओरपणारे नगरसेवक हवेतच कशाला ?
महापालिका अधिकाऱ्यांची कार्यपातळी तपासणी वेळोवेळी स्वतंत्र संस्थेकडून करवुन त्यात वेळोवेळी पारदर्शक सुधारणा होत राहिली तर आतापर्यंत त्यांच्या सहकार्याने होत असलेल्या भ्रष्ट कारभारावर आपले कोटिकोटिचे इमले उभारून माजलेल्या ह्या नगरसेवकांची गरजच काय?
तेव्हा आता खरंच पाळी आली आहे कि हे किडलेले भ्रष्ट नगरसेवक पद कायमचे गाडून टाकले पाहिजे, मग त्याच्या निवडणुकांचा किळसवाणा खेळखन्डोबा तर थांबेलच वर त्यावरील होणारा अनावश्यक खर्च हा नगर सुधारण्यासाठी कामी येईल. त्याबरोबरच इतिहासातच रमणारे काही राजकीय पक्ष, नेते हे पण अस्त पावतील व ती ह्या काळाची गरजच होती म्हणून आपल्या इतिहासातच नोंद केली जाईल !
— राजेन्द्र नन्दा
Leave a Reply