लतादीदींबद्द्ल जेव्हढं लिहू तेवढं कमीच आहे. आज भूलेंबिसरे गीतमध्ये दीदींचे काही किस्से…
एकदा एका रेडियो इंटरव्यू दरम्यान दीदींना एक प्रश्न विचारण्यात आला होता, “आपल्याला आपल्या योग्यतेपेक्षा जास्त प्रसिध्दी, पैसा, ऐश्वर्य लाभलं, असं कधी जाणवलं का? आणि त्याबद्दल काही अपराधिक भावना वैगरे?” दीदी अतिशय सरलतेने उत्तरल्या, “मी परमेश्वराची खरंच खूप आभारी आहे की त्याने मला जे काही दिलं, ते खूपच जास्त दिलं. माझ्यापेक्षाही चांगलं गाणारे आणि समझणारे खूप सगळी लोकं आहेत परंतु जी ख्याती मला लाभली, ती फारच कमी लोकांना लाभते. माझ्यापेक्षा चांगलं गाणारे, जसे बड़े गुलाम अली खान साहेब, किंवा अमीर खान साहेब, सेहगल साहेब यांच्यासारखे मी तर गाऊच शकत नाही.”
मधुबाला पासून माधुरी दीक्षित आणि काजोल पर्यंत हिंदी चित्रपटांमध्ये अशी एकही मोठी अभिनेत्री नसेल जिच्यासाठी दीदींनी गायले नसेल.
लतादीदींच्या घरी केवळ के.एल. सेहगल यांची गाणी गायला परवानगी होती. आणि कारणही तसंच होतं, दीदींच्या वडिलांना, म्हणजेच, पंडित दीनानाथ मंगेशकरांना शास्त्रीय संगीत खूप आवडायचं.
एकदा त्यांनी रेडिओ विकत घेतला आणि तो सुरू केल्याकेल्या त्यावर सेहगलसाहेब गेल्याची बातमी ऐकली. ही बातमी ऐकल्याबरोबर त्या रेडिओ परत करून आल्या.
हेमंत कुमार सोबत गाणी गाताना दीदींना खूप त्रास व्हायचा. त्याकाळी गायकांना एकाच माइक्रोफोनने काम चालवावं लागत असायचं. हेमंतदांची उंची जास्त असल्याने दीदींना स्टूलवर उभं राहून गाणी गावी लागत होती.
दीदींना तिखट मसालेदार जेवण बेहद पसंत आहे. असं म्हणतात की त्या एका वेळेस १०-१२ हिरव्या मिरच्या खायच्या. त्यांचा स्वतःचा असं तर्क होता की तिखट खाण्याने गळ्यात जी जळजळ होते त्याने आवाज जास्त खुलतो.
असे अनेक किस्से आहेत…. म्हणूनच वर नमूद केल्याप्रमाणे दीदींबद्द्ल कितीही लिहिलं ते कमीच आहे.
आज ऐकू यात शंकर हुसैन चित्रपटातील ‘आप यूँ फसलों से गुजरते रहे’ हे गाणं….
चित्रपट : शंकर हुसेन (१९७७)
गीतकार : जाँ निसार अख्तर
संगीतकार : खय्याम
गायक : लता मंगेशकर
आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही
आहटों से अंधेरे चमकते रहे
रात आती रही रात जाती रही
हो, गुनगुनाती रही मेरी तन्हाईयाँ
दूर बजती रही कितनी शहनाईयाँ
जिन्दगी, जिन्दगी को बुलाती रही
आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही
आप यूँ…
कतरा कतरा पिघलता रहा आसमाँ -२
रूह की वादियों में ना जाने कहाँ
इक नदी, इक नदी दिलरूबा गीत गाती रही
आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही
आप यूँ…
आप की गरम बाहों में खो जायेंगे
आप की नरम जानो पे सो जायेंगे, सो जायेंगे
मुद्दतों रात नींदें चुराती रही
आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही
आप यूँ…
संग्राहक आणि संकलक:- प्रफुल्ल गायकवाड
Leave a Reply