नवीन लेखन...

भुयारी

पोरगं बाहेर आलं. हातातल्या मळक्या कपड्याने त्याने टेबल साफ केलं आणि उचलावी की उचलू नये असा विचार करत ती नोट त्याने गल्ल्यावर नेऊन दिली. ‘क्या गंदा काम करता है!’ एवढच पुटपुटत तो आत निघून गेला.


मोर बसलेला माणूस गुडघ्यात मान घालून बसला होता. त्याच्या हातावर पांढरे चट्टे दिसत होते. केसही विरळ झालेले. अंगात झ्गमगीत पॉलिस्टरचा शर्ट, काही पॅण्ट आणि कुठला तरी भपका मारणारा हलका सेंट त्याने अंगावर ओतलेला असावा.

पाऊस पडत असतानाही तो हॉटेलातल्या बाहेरच्या बाकडयावर बसून होता. आत टेबलं रिकामी होती. तरी बाहेरच बसून राहिला. पाऊस पडतच होता. हॉटेलच्या पोऱ्याने एक चहाचा पेला आणून त्याच्यापुढे आदळला आणि निघून गेला. त्यान चहा गटागटा ढोसला. पावसाकडे पाहिल आणि टेबलावरच पैसे ठेवून तो निघून गेला. मी पाहत राहिलो. त्याच्या वागण्यात काही तरी चमत्कारिक अलिप्तपणा जाणवत होता. इतक्या लहान हॉटेलात अस टेबलावर पैसे ठेवून कुणी निघून जात नाही.  टीपही ठेवत नाही.

पोरगं बाहेर आल. हातातल्या मळक्या कपडयाने त्याने टेबल साफ केल आणि उचलावी की उचलू नये असा विचार करत ती नोट त्याने गल्ल्यावर नेऊन दिली. ‘क्या गंदा काम करता है’ एवढच पुटपुटत तो आत निघून गेला.

झगमगीत शर्ट घालून, वाटीभर सेंट फासून शून्यात नजर लावून बसलेला तो माणूस काय गंदा काम करत असेल, असा विचार बऱ्याच वेळा मनात आला.

त्यानंतर तो एक-दोन वेळा त्याच हॉटैलात त्याच ठिकाणी बसलेला आढळला. पोऱ्याने चहा आणून दिला. तो प्याला आणि पैसे टेबलावर ठेवून निघून गेला. एका शब्दानेही कुणाशी काही बोलला नाही. माझी उत्सुकता वाढली होती. काय काम करत आसावा. फक्त दरवेळी शर्ट नवीन होता, असाच भडक आणि चमकणारा.

रात्री उशिरा परत येत होतो. मुख्य रस्त्यावरच काम सुरु होते. रस्त्याच्या मध्यभागी असलेले गटारावरील गोल झाकण उघडण्यात आल होते. पेट्रोमॅक्सची एक बत्ती, लांब दोरखंड, लोखंडी सामान, सळया घेऊन सात-आठ लोक उभे होते. कुणीतरी उजेड दाखवत असावा. अत्यंत उग्र स्वरुपाची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती. येणारे- जाणारे नाकाला रुमाल लावून लवकरात लवकर रस्ता ओलांडून जात होते.

त्या मॅनहोलच्या भोवती उभे असलेले हातातील दोरखंड खेचून काहीतरी बाहेर काढत होते. दोरखंड ओढून कुणाला तरी बाहेर काढण्याच काम चालू असाव. मी रस्ता ओलांडून पलीकडे जात असतानाच एक चेहरा हलकेच त्या गटाराच्या भुयाराून बाहेर आला. चेहरा सगळा काळोखाने माखलेला. पण ओखळीचा वाटला. वर उडी मारताना त्याने माझ्याकडे बघितल. डोळयात ओळख पटली. पण मला आठवेना.

खूप प्रयत्न केला. चेहरा आठवेना. एकदा त्याच हॉटेलात चहा प्यायला गेलो आणि त्य रिकाम्या बाकडयाकडे पाहून आठवल, अरे तो गटारातून वर आलेला इसम आणि बाहेर भरपावसातही बाकडयावर झगझगीत शर्ट घालून बसणारा इसम एकच. त्या दिवशी तो भेटला नाही. नंतर मी विसरुन गेलो.

त्यानंतर एकदा असाच तो रस्त्यावरुन जाताना भेटला. मी थांबल्यावर तोही थांबला. काय कुणास ठाऊक त्याच्या विषयी कारण नसताना एक सहानुभूती वाटू लागली होती. काही न बोलता तो निघून गेला. तो कुठल्या प्रकारच गंदा काम करतो ते कळल होत.

मुंबई शहरात भुयारी गटारांच जाळ पसरल आहे. असेच एक ते दोन हजार किलोमीटर अंतराचा काही भाग यंत्राच्या सहाय्याने साफ केला होता. उरलेला भाग तो झगमगीत शर्टवाला उतरुन साफ करतो.

हॉटेलमध्ये भेटल्यावर तो भडभडा बोलला. गेली १५ वर्ष तो २० ते ३० फूट खोल गटारात उतरुन तो साफ करण्याच काम करतोय. आतील विषारी वायूचा परिणाम झालाय. काम जोखमीच, पण त्यामानाने पगार नाही. त्याच्यासारखे दोनशे भुयारी लोक मुंबईची गटार साफ करण्याचे काम जिवावर उदार होऊन करतात. त्यांना कोणतही उपकरण देण्यात येत नाही. काही, लोक  विषारी वायूमूळे आतल्या आत मेले. त्यांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले नाही. ‘आज नही तो कल मरने का है’ तो सांगत होता. दु:ख वेगळयाच गोष्टीच आहे. तो काय काम करतो हे माहीत असल्यामुळे हॉटेलवाला त्याला आत घेत नाही. सगेसोयरे, मित्रमंडळीही टाळतात. पण इलाज नाही., पोटापाण्यासाठी कराव लागत.

नाकातला वास जात नाही. मग त्यासाठी मिळेल ते अत्तर अंगाला चोपडाव लागत. दर रात्री भुयारात उतराव लागत.

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनाक : १८ जुलै १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..