माझ्या माहिती प्रमाणे बिब्याचा वापर पूर्वी परिट कपड्यांवर खुणा करून ठेवायला करत असत.तर असा हा बिब्बा औषधांमध्ये काळजीपूर्वक वापरल्यास अमृता समान काम करतो.
ह्याचा ७-१२ मीटर उंच वृक्ष असतो.काण्डत्वचा काळपट राखाडी असते व तोंडल्यावर त्यातून दाह जनक रस निघतो.पाने ३०-७५ सेंमी लांब असून १२-३० सेंटीमीटर रूंद असतात.हि अभिलट्वाकार असून शाखेच्या अग्रभागी उगवते.फुल एकलिंगी असून हिरवट पिवळे असते.फळ २-३ सेंमी लांब व हृदयाकृती असते.कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर चमकदार काळे असते.पिकलेल्या काळास असतो जो अंगावर उततो.फळाच्यावर नारिंगी लाल रंगाचे मांसल भाग असतो जो खायला उपयोगी असतो.फळात बदामासारंखी बी असते व तिच्यापासून तेल काढतात.
भल्लातक चवीला तिखट,तुरट,गोड असून उष्ण असतो.तसेच हा गुणाने हल्का,स्निग्ध व तीक्ष्ण असतो.हा कफवात शामक व पित्तकर आहे.
आता आपण भल्लातकाचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)संडासला अाव पडत असेल व रूग्णाला पित्ताची लक्षणे नसल्यास बिब्याचे तेल तुप साखरेत पाडून पोटात घेण्यास देतात.
२)अंकुशमुखी कृमींमध्ये अर्थात हुकवर्ममध्ये बिब्ब्याच्या तेलाचा उपयोग होतो.
३)वातज किंवा कफज त्वचा रोगात तसेच कोडामध्ये बिब्याचा उपयोग होतो.त्वचारोगामध्ये बिब्बा सिद्ध दुध वापरले जाते.
४)भल्लातक सिद्ध दुध किंवा भल्लातक सिद्ध तेल हे मासिकपाळीच्या तक्रारीमध्ये उपयुक्त आहे.
५)भल्लातक वातवाहिन्यांच्या आजारात चांगला उपयुक्त आहे म्हणूनच गृध्रसीमध्ये ह्याने सिद्ध दुध वापरले जाते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Muze white bibba kahi milega Kya? Please send mobile number and address