मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्स जन्म २८ ऑक्टोबर १९५५ रोजी झाला.
अमेरिकेतील सिटल येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बिलने सुरवातीपासूनच अभ्यासात चमक दाखवली. शाळेत मिळणाऱ्या संगणक शिक्षणाच्या संधीचा बिलने पुरेपूर फायदा घेतला. आपल्या रोजच्या जगण्यात संगणकाचा कसा उपयोग करता येईल याचे बिल यांनी अनेक प्रयोग करून पाहिले. १९७३ मध्ये बिल गेट्स यांनी हॉवर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. रात्र-रात्रभर बिल आणि मित्र पॉल ऍलेनने प्रयोगशाळेत असायचे. दोघांनी भविष्यात येणाऱ्या संगणकात लागणारी विविध सॉफ्टवेअरची गरज ओळखली. त्यांनी “मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन‘ची स्थापना केली. पहिली काही वर्षे कंपनीला खडतर वाटचाल करावी लागली. १९८० मध्ये मायक्रोसॉफ्टला आय.बी.एम. कंपनीने पर्सनल कॉम्प्युटरसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम दिले. हे संगणक प्रचंड लोकप्रिय झाले.
बिल गेटस्नी १९९३ मध्ये “विंडोज ३.१‘ बाजारात आणले. त्याची महिनाभरात लाखोंवर विक्री झाली. १९९५ मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस, फ्रंट पेज, इंटरनेट एक्सआपोजर यांची निर्मिती बिलच्या कंपनीने केली. जगभराच्या प्रत्येक कोपऱ्यात मायक्रोसॉफ्टने आपलं उत्पादन पोचवलं. जग संगणकमय करण्यात मायक्रोसॉफ्टचा मोठा हात आहे. बिल गेट्स ह्यांनी एक वृक्ष लावला व तो फोफावला. विंडोज अतिशय लोकप्रिय झाल्यामुळे व कॉम्प्युटर आणि लॅपटॉप वाढल्यामुळे या कंपनीला वारेमाप नफा मिळत गेला. तीच ती एक विंडोज ऑपरेटींग सिस्टीम ही त्यांची दुभती गाय झाली.
बिल गेटस् यांनी लिहिलेलं, “द रोड अहेड‘ हे पुस्तक खूप गाजलं. उद्योग – व्यापारातील प्रश्नॉ डिजिटल पद्धतीच्या नव्या मूलभूत मार्गाने कसे सोडवता येतील याविषयी “बिझनेस ऍट द स्पीड ऑफ थॉट‘ हे पुस्तक लिहिलं, तेही गाजलं. गेल्या २२ वर्षात १७ वेळा बिल गेटस यांनी सर्वाधिक श्रीमंत असण्याचा मान मिळवला आहे. बिल गेटस यांनी त्याच्या मायक्रोसॉफ्टमधील शेअरच्या हिश्यापैकी ५ टक्के शेअर्स दान म्हणून दिले असून त्याची किंमत ४.६ अब्ज डॉलर्स आहे.
बिल गेट्स यांनी प्रत्येक दिवशी दहा लाख डॉलर्स खर्च केले तरीसुद्धा त्यांच्याकडील पूर्ण संपत्ती संपायला २१८ वर्षे लागतील अशी आश्चर्यजनक माहिती “ऑक्सतफॅम‘ या संस्थेने तयार केलेल्या अहवालातून पुढे आली आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोजची देणगी देणारे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक व जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेटस यांनी एका मुलाखतीत ते स्वतः विंडोज नाही तर गुगलच्या अॅड्राईड ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करतात असे फॉक्स न्यूजवर झालेल्या मुलाखतीत सांगितले होते.
बिल गेटस् हे जगातील नव्हे तर या शतकातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सर्वसामान्यांना त्यांची ओळख आहे; पण अशी ओळख हा त्यांच्यावर अन्याय आहे. येणाऱ्या शतकातील लोकांची जीवनशैली बदलण्याचे काम बिल गेटस् या माणसाने केले आहे.
बिल गेटस् यांनी यापूर्वीच आपली २८ अरब डॉलरची संपत्ती दान केलीय. आता त्यांनी स्वत:ला पोलिओ अभियानासाठी झोकून द्यायचं ठरवलंय. ‘आता माझ्याकडे अन्न आणि वस्त्राची निश्चिती आहे. त्यामुळे एका सीमेनंतर माझ्याकडे असणाऱ्या पैशांचा मला काही एक उपयोग नाही. या पैशांचा एकमात्र उपयोग म्हणजे संस्था निर्माण करणं आणि त्यांना जगातील सर्वात अधिक वंचित व्यक्तींपर्यंत ते पोहचवणं…’
बिल गेटस् यांच्याजवळ वॉशिंग्टनमध्ये सरोवराच्या काठी उभारलेला १५ करोड डॉलर्सचा बंगला आहे. या बंगल्याच्या परिसरातच भव्य असा स्वीमिंग पूल बांधण्यात आलाय… ज्यामध्ये पाण्याच्या आत म्युझिक सिस्टम लावण्यात आलाय.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply