नवीन लेखन...

बिल्ट कागद कंपनी

आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाचं सुमारे ९५ टक्के अवलंबित्व हेकागदावर अर्थात पेपरवर आपली दैनंदिनी देखील कागदावर अवलंबून आहे. साधा कुणाला पत्तालिहून द्यायचा असेल तर कागदाची निकड भासते. कागदाचा शोध जरी चीनमध्ये लागला असला तरी कागदाचं सर्वाधिक,उत्पादन मात्र आपल्या  हिंदुस्थानातचः आपण यूएस., ऑस्ट्रेलिया, युरोपियन राष्ट्रांसह सुमारे ३0′ ते ३५ राष्ट्रांना कागद पुरवतो.

त्याचा कागद बोलतो’, ‘कागदावर आणा’, ‘कागद पाहिजे’ अशी वाक्ये जी नियमित बोलीभाषेत वापरली जातात. ती मोठी आशयगर्भ असतात. ‘स्वच्छ’ किंवा ‘निःसंदिग्ध’, ‘पारदर्शी’ किंवा ‘सत्य’ अशा अर्थाने आणि विश्वासाने कागदावरील लिखाणाला’ अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकूणच कागदावरील मजकूर – कागदावरील लिखाण आपली इमेज म्हणजे प्रतिमा स्वच्छ आणि स्पष्ट करण्याला मदत करते. ‘प्रतिमा’ स्वच्छ असेल तर ‘प्रतिष्ठा’ वाढते. अगदी एखाद्या बांधकामाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे पुढे जाते तशीच प्रतिष्ठादेखील बांधली जाते. मोठमोठी होत जाते. ‘टू बिल्ट द इमेज’ या अर्थाने करमचंद थापर यांनी एक स्वप्न पाहिलं आणि १९९० ते १९९९ या दशकात ‘BILT’ ‘बिल्ट’ या उत्कृष्ट पेपर उत्पादन करणाऱ्या कंपनीचा जन्म झला.

बांबूपासून कागद बनविणारी जगातील ही पहिली कंपनी आहे. खेळायचे पत्ते PLAYING CARDS साठी अर्थात ९० टक्के प्ले-कार्डससाठी बिल्टचा कागदच छपाईसाठी वापरला जातो. काही नावाजलेल्या नियतकालिकांमध्ये उदा. इंडिया टुडे, रिडर्स डायझेस्ट, कॉस्मोपोलिटन, आऊटलुक, आऊटलुक मनीसारखी नियतकालिके बिल्टचा पेपर वापरतात. बिल्टने गोल्फ या खेळाचे प्रमोशन केले. हिंदुस्थानच्या आंतरराष्ट्रीय गोल्फ खेळाडू असलेल्या विजय सिंग यांना कंपनीने प्रमोट केले.

दर्जा आणि विश्वास या दोन गुणात्मक बाबी व्यवसायाला बिल्ट करीत असतात. बांधत असतात. या दोन्ही गुणांचे पुनर्उत्पादन (Reproduction) म्हणजे बिल्ट पारंपरिक बदल ज्यात प्रतिबिंबित होतात अशा आशयाचा लोगो कंपनीने बनवलेला आहे.

लाल चौकोन म्हणजे ‘विजय’ आणि ‘ध्येय गाठणे’ असे कंपनीला सुचवायचे आहे, तर पांढऱ्या अक्षरांमधील बिल्ट म्हणजे आत्मा (Sprit) केंद्रबिंदू/ केंद्रीभूत (Focus) आणि अमर्यादित शक्ती (Integrity) यांचं प्रतिक आहे असं कंपनीला सांगायचं आहे.

अशा आशयपूर्ण सामाजिक आणि राष्ट्रीय स्वामी निष्ठतेचं भान ठेवणाऱ्या या कंपनीने आणखी एक जागतिक उपक्रम आजपर्यंत सुरू ठेवला आहे. Comprehensive Farm Forestry Programme (CFFP) या मथळ्याने कागद तयार करण्यासाठी कंपनीने कच्च्या मालाच्या निर्मितीचा उपक्रम राबविला आहे १८००० शेतकऱ्यांना कंपनीने आर्थिक सहाय्य देऊन २१९०० हेक्टर जमिनीवर ८० लाखांहून अधिक बांबू बेटांचे ‘प्लांटेशन’ केले आहे. त्यामुळे कच्च्या मालाची व्यवस्था झाली. हजारो हिंदुस्थानींना रोजगार उपलब्ध झाला. हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान देणारी बिल्ट ही पहिली पेपर कंपनी आहे. आज उभ्या जगभरात दर्जा सांभाळन कागद निर्मितीच्या क्षेत्रात नंबर वन ठरलेली ही संस्था आहे. त्याच्या जाहिरातीचा लोगो पक्क देश-विदेशात मनावर बिंबवला आहे.

– प्रा. गजानन शेपाळ

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 30 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..