भारतीय संस्कृतीत बेल किंवा बिल्ववृक्षाला फार महत्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरु करण्यात आली.
भावप्रकाश, सुश्रुत साहिंता, भैषज्य रत्नावली आदी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बेलाच्या उपयोगाबाबत खूप लिहून ठेवलेले आहे. उष्णताहरक, वात कफ शामक, रेचक, दीपनकारी, हृदयास उपकारक, स्तन्भक, शरीरातील मुत्र व शर्करा कमी करणारा आदी महत्वपूर्ण गुणधर्म असलेला बेल आयुर्वेदाचा महत्वपूर्ण झाड आहे.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply