नवीन लेखन...

समांतर व व्यावसाईक चित्रपटाचा समन्वय- बिमल रॉय

ज्या काळात हिंदी चित्रपटात कलात्मक सिनेमा हे नावही अस्तित्वात नव्हते त्याकाळात व्यावसायिक व कलात्मक चित्रपटाचा उत्तम संगम ज्याने साधला ते होते बिमल रॉय. त्यांनी मी कलात्मक चित्रपट निर्मितो असा धिंडोरा पिटला नाही.ते म्हणत मी अतिशय सामान्य कलाकार आहे.मला वाटते कि मी हे  लोकांसमोर मांडावे असे वाटते,  ते मी चित्रपटामधून मांडतो.

बिमल रॉय यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी सौपूर ढाका येथे झाला त्यांचे वडील जमीनदार होते. ते कलकत्याला कॉलेजात शिकत असताना वडील वारले. जमीनदारी पाहणाऱ्या ठेकेदाराने जमीन हडपली. त्यामुळे त्यांना पोटापाण्यासाठी बाहेर पडावे लागले.ते  न्यू थेटर मध्ये कामाला लागले.तिथे सहायक दिग्दर्शक व फोटोग्राफर म्हणून काम बघू लागले. सैगलच्या देवदासची फोटोग्राफी केली.नंतर बॉम्बे टोकीजसाठी “मा” चित्रपट दिग्दर्शित केला. अशोककुमारकडे “परिणीता”चित्रपटाचे हक्क होते. तो दिग्दर्शनासाठी मिळाला.

१९५३ साली स्वताच “बिमल रॉय प्रोडक्शन “ सुरु केले.बऱ्याच कथा मागवल्या. त्यामध्ये एका लेखकाने लिहिलेली “रिक्षावाला” कथा होती.ती बिमल रॉयना आवडली.पण कथाकाराने अट घातली कि या चित्रपटाचे संगीतही मीच देणार.तेही मान्य झाले.तो कथाकार होता. संगीतकार सलील चौधरी. जेव्हा त्यांचे सहायक रित्विक घटक  हिरो म्हणून बलराज सहानी यांना घेऊन आले तेव्हा बिमलदा चाट झाले गोरापान, सुटातला, अस्खलित इंग्रजी बोलणारा,बीबीसीवर निवेदक हा  गरीब शंभू मोहतो करणार ? पण गेट अप बघितल्यावर ते तयार झाले.महिनाभर खरच रिक्षा चालवायला सांगितली.अर्धपोटी राहायला सांगितले.निरुपा रॉयला चोरबाजारातून वापरलेल्या साड्या दिल्या.व ताकीद दिली शूटिंग संपेपर्यंत साड्या न धुता घालायच्या.ह्या चित्रपटाला फिल्म फेअर मिळाले.सिनेमाला चीन रशिया,कान्समध्ये खूप प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर १९५४ मध्ये  “नौकरी” केला तोही किशोरकुमार सोबत म्हणजे तारेवरची कसरत.पण किशोरकुमार बिमलदा बरोबर नखरे करणे शक्यच नव्हते.पण नौकरी आणि बिरज बहुला व्यावसायिक यश मिळाले नाही.१९५५मध्ये देवदास केला त्यात आधी नर्गिस व मीनाकुमारी घेण्याचे ठरले.पण ते जमले नाही. म्हणून वैजयंतीमाला व सुचित्रा सेन आल्या.सैगलच्या देवदासची फोटोग्राफी केल्यामुळे देवदास मध्ये काय दाखवायचे हे पक्के डोक्यात होते.याच चित्रपटापासून दिलीपकुमारला “Tragedi king” उपाधी मिळाली.आणि प्रेक्षकांना दिलीपकुमार व मोतीलालच्या अभिनयाची जुगलबंदी. १९५८मध्ये मधुमती आला.जो पुनर्जन्मावर आधारित होता. हा चित्रपट त्यांच्या प्रवृत्तीपेक्षा वेगळा होता. त्यावर टीकाकारांनी भरपूर टीका केली.बिमलदा आता व्यावसायिक बनले. पण बिमलदाच म्हणणे होते,मला योग्य वाटले तेच केले.या चित्रपटाने त्यांना यश मिळवून दिले.सगळे शुटींग झाल्यावर लक्षात आले कि शेवटच्या काही भागाचे शुटींग नीट झालेच नाही,आता पुन्हा नैनितालला जाणे शक्य नाही.तेव्हा कृत्रिमरीत्या धुके तयार करून महाबळेश्वरला शुटींग केले.कोणाला लक्ष्यातहि येत  नाही कि शुटींग महाबळेश्वरला झाले आहे.बिमलदांच्या मुलाने ठरवले मधुमती कलर करायचा,तेव्हा एका बुजुर्ग कलाकाराने सांगितले,  विचारही मनात आणू नकोस,कारण बिमलदानी चित्रपटाची प्रत्येक फ्रेम black & white चा विचार करून शूट केली आहे.

१९५९मध्ये सुजाता आला स्पृश्य अस्पृश्यता हा विषय घेऊन ज्यात त्यांनी निवडली नूतन आणि तिच्या बोलक्या डोळ्यांनी आणि अभिनयानी चित्रपट उंचीवर नेऊन ठेवला तिच्या आईच्या भूमिकेसाठी सुलोचनाबाईना विचारले गेले.त्या तयार नव्हत्या.तेव्हा ललिता पवारनी समजावले,तू कोणाबरोबर काम करणार आहेस याची कल्पना आहे का ? तू आज मराठी चित्रपटाची नायिका आहेस.किती वर्ष नायिका  म्हणून काम करशील ? पुढे काय ? तुझ्यासाठी हिंदीच दार उघडतंय हि संधी सोडू नकोस.ललिता पवारांच्या मनाचा किती मोठेपणा आणि त्यासुद्धा सुजातामध्ये आहेत.१९६० साली पारख आला चित्रपट संपूर्णपणे मोतीलालचा होता.त्याचा नेहमीचा सहजसुंदर अभिनय सलीलदाच संगीत. परखच्या वेळी साधनाच्या “ लव इन शिमला “ चे शुटींग चालू होते.ती बिमलदा कडे आली तेव्हा तिचा साधना कट होता बिमलदा म्हणाले “ हि अशी modern नायिका खेडवळ भूमिकेसाठी नको” तेव्हा तिचा खरा चेहरा दाखवल्यावर बिमलदाचे समाधान झाले.बंदिनी १९६३मध्ये आला त्यासाठी बिमलदाना नूतनच हवी होती.त्यांनी सांगितले तू नसशील तर मी बंदिनी करणार नाही.तेव्हा तिचे लग्न झाले होते.तिच्या नवऱ्याने आग्रह केला कि तू चित्रपट कर.या चित्रपटाच्या निमित्ताने एक  गीतकार हिंदी सिनेमाला मिळाला. गुलजार.ते मोटार गेरेजमध्ये काम करत होते.या चित्रपटावेळी बिमलदा म्हणाले “तू माझ्याकडे काम करायचं ,पुन्हा गेरेजमध्ये जायचं नाही” गुलजार म्हणतात “ मी गीतकार नंतर आहे बिमलदाचा assistant पहिल्यांदा.”

बिमलदानी आपल्या banner खाली काही चित्रपट बनवले,” अपराधी कौन’, उसने कहा था, काबुलीवाला”पण त्याचे दिग्दर्शक दुसरे होते.तसेच त्यांनी दुसऱ्या banner साठी चित्रपट दिग्दर्शित केले. “बाप बेटी,हमराही प्रेम पत्र ,यहुदी “ असा  हा महान दिग्दर्शक ८ जानेवारी १९६६ ला जगाला अलविदा करून गेला, पण दोन अतिशय प्रतिभाशाली सहायक दिग्दर्शक मागे सोडून हृषीकेश मुखर्जी आणि गुलजार.

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..