नवीन लेखन...

द्विनेत्री (बायनॉक्युलर्स)

प्रकाशशास्त्र म्हणजे ऑप्टिक्समध्ये कॅमेरा, दुर्बीण यांच्याखालोखाल सर्वांत लोकप्रिय उपकरण म्हणजे द्विनेत्री त्यालाच बायनॉक्युलर असे म्हणतात. बहुतांश लोक अशा बायनॉक्युलरचा वापर क्रिकेट सामने पाहताना किंवा पक्षी निरीक्षणसाठी करीत असतात. एका नेत्रिकेची दुर्बीण जे दाखवते त्यापेक्षा अधिक दोन नेत्रिका असलेल्या बायनॉक्युलरमुळे आपल्याला दिसत असते. सर्वांत लोकप्रिय डिझाइन्समध्ये भिंग वापरलेले असते.

यात आपल्याला डावीकडचे उजवीकडे व वरचे खाली असे दाखवणारी प्रतिमा असते. त्यामुळे हा उलटापुलटा मामला सरळ करण्यासाठी त्यात प्रिझम्सचा (लोलक) वापर केला जातो. कुठलाही प्रकाशकिरण ऑब्जेक्टिव्ह लेन्स ते नेत्रिका (दुसरे भिंग) असा प्रवास करीत असताना या प्रिझममधून चार वेळा परावर्तित होतो. त्यामुळे प्रकाश एका छोट्या अंतरासाठी मोठा मार्ग कापतो. त्यामुळे दुर्बिणींमध्ये ज्या ट्यूब्ज वापरतात, त्यापेक्षा बायनॉक्युलरमध्ये त्या कमी लांबीच्या असतात.

एका प्रिझममुळे ९० अंशातून व दुसऱ्या प्रिझममुळे आणखी ९० अंशातून अशी १८० अंश कोनातून प्रतिमा फिरते, त्यामुळे ती हवी तशी तयार होते. बायनॉक्युलरमध्ये ऑब्जेक्टिव्ह लेन्स हे एखाद्या वस्तूवर केंद्रित केल्यानंतर त्या वस्तूची वास्तव प्रतिमा पुढ्यात तयार होते पण नेत्रिकेचे दुसरे भिंग त्याची आभासी प्रतिमा तयार करते, त्यामुळे आपल्याला निरीक्षण करीत असलेला पदार्थ किंवा पक्षी मोठा दिसतो. बायनॉक्युलर्स या जड असतात कारण त्यात प्रिझमचा वापर केलेला असतो. पण फील्ड ग्लासेस प्रकारातील द्विनेत्रींमध्ये आपल्याला त्या हलक्या दिसतात कारण त्यात प्रतिमांचे नियोजन करण्यासाठी भिंगांचाच वापर केलेला असतो त्यात प्रिझमचा वापर टाळलेला असतो. बायनॉक्युलरची खरेदी करताना आपल्याला दोन आकडे नेहमी दिसतात.

उदा. ७ बाय ५० याचा अर्थ ती बायनॉक्युलर कुठलाही पदार्थ ७ पटींनी मोठा करून दाखवते व त्याच्या ऑब्जेक्टिव्ह भिंगाचा (वस्तूच्या जवळ असलेले भिंग) व्यास हा ५० मि.मी आहे. ऑब्जेक्टिव्ह भिंगाचा व्यास जेवढा जास्त, तेवढा वस्तूकडून येणारा जास्त प्रकाश भिंगाला मिळतो व वस्तू अधिक स्पष्टपणे दिसते. वस्तू किती पट मोठी दिसणार हे अवलंबून असते. बायनॉक्युलर खरेदी करताना वस्तू जास्त मोठी दिसावी म्हणून केवळ एकाच आकड्याकडे बघू नका. भिंगाचा व्यासही तेवढाच महत्त्वाचा असतो कारण तो मोठा नसेल तर प्रतिमा स्पष्ट दिसत नाही.

मोठ्यात मोठी बायनॉक्युलर तुम्हाला प्रतिमा ३५ पटींनी मोठी करून दाखवू शकते. ८ बाय ३६ ते ८ बाय ४० च्या बायनॉक्युलर्स या पक्षिनिरीक्षणासाठी वापरल्या जातात. गॅलिलियन बायनॉक्युलर्समध्ये आपल्याला अंतर्गोल (ऑब्जेक्टिव्ह) तर बहिर्गोल (नेत्रिका) अशा दोन्ही प्रकारची भिंगे वापरलेली दिसतात. जोहान लिपरशे याने बायनॉक्युलरचा शोध लावला असे सांगितले जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..