बायोकेमिस्ट्रीची सुरुवात
हार्वेन शोधलेल्या रक्तभिसरण कसं होतं , हे मत न मानणारी मंडळी असतानाच एका नावासलेल्या विचारवंताला मात्र हार्वेचं हे मत पटलं. तो विचारवंत होता रेने देकार्त . रेने देकार्त चा जन्म १५९६ रोजी झाला आणि मृत्यू १६५० रोजी झाला.
रेने देकार्त च्या म्हणण्याप्रमाणे माणसाचं शरीर हे म्हणजे वेगवेगळ्या यंत्रे एकत्र येऊन तयार झालेलं , एक मोठं यंत्रच आहे. यापासूनच जिओवानी बोरेली या न माणसाच्या शरीराचे स्नायू कसे काम करतात यावर संशोधन करून त्याचा शोध लावला. रेने देकार्त च्या काही थियरीज चुकीच्याही होत्या . पण त्याच्या थेअरीचा प्रभाव मात्र समाजामध्ये खूपच होता.
आपल्या शरीरातील स्नायू आणि हाड यांचं कार्य शरीरात कसं चालतं हे त्यांना दाखवून दिलं होतं. त्याच काळात ‘ जाँ बाप्टिस्टा फॉन हेल्मोंट ‘ या पॅरासेल्ससचा शिष्य असलेला फ्लेमिश अल्केमिस्ट या संशोधकाच्या डोक्यात अनेक प्रश्न पडू लागले. जसे काही अवयवांमधल्या क्रिया ह्या यंत्रासारख्या काम करत असतील का ? काही काम ही रसायनिकही करत असतील का ? असे अनेक प्रश्न त्याला पडू लागले. व त्याचं समाधानकारक उत्तर मिळविण्यासाठी त्यान प्रत्यक्ष प्रयोग करायला सुरुवात केली. त्यानं जे काही प्रयोग केले ते त्यानं हार्वेच्याच काळात केले . त्यांना फक्त हार्वेच्या काळातच संशोधन करायला सुरुवात केल होत असं नाही. त्यानं त्या अगोदर कचरा, चिखल आणि दलदल यांच्यापासून माशा, किडे आणि उंदरासारखे जीव तयार होतात का याबद्दल काही मुद्दे लिहून ठेवले होते. त्यानं इतरही विषयात भरपूर असं संशोधन केलं होतं. त्यानं झाडांवर सुद्धा अनेक प्रयोग केले होते. पुढे त्यानं हवेसाठी ‘ एअर’ हा शब्द प्रथम शोधून काढला होता. हवेत पाण्याची वाफ असते हे सुद्धा त्यानंच शोधलं होतं. वायु साठी ‘ गॅस ‘ हा शब्दही त्यानेच प्रथम सुचवला होता आणि वापरला होता. परंतु एवढं सर्व गोष्टी शोधून काढणाऱ्या व्यक्तीबद्दल काही माहितीत मात्र गोंधळ आहे. हेल्मोटया संशोधकाचा जन्म केव्हा झाला. यावर खूप गोंधळ आहे. काही लोकांच्या मते त्याचा जन्म १५७७ मध्ये झाला , तर काही लेखी कागदपत्रांमध्ये तो १५७९ असा लिहिलेला आहे. काही ठिकाणी त्याच्या जन्माची नोंद १५८० ची आढळते.
परंतु जरी त्याच्या जन्माच्या तारखेबद्दल गोंधळ असला , तरी त्याच्या मृत्यूची नोंद मात्र सगळीकडे सारखीच आढळते. त्याच्या मृत्यूची नोंद ही १६४४ ची आहे, असे नोंदी द्वारे दिसते. जरी त्याच्या जन्माच्या तारखेत घोळ आहे . तसच त्याच्या नावातही घोळ आहे. अनेक ठिकाणी त्याची वेगवेगळी नावे लिहिलेली आढळतात . जरी त्याच्या नावात आणि जन्माच्या तारखेत घोळ असला , तरी त्यानं बायोगकेमिस्ट्रीत या विज्ञान शाखेत केलेलं संशोधन फारच महत्त्वाचा आहे. हेल्मेटला लहानपणापासून विज्ञानात गती होती. परंतु विज्ञान या विषयात त्याला नेमकी कोणती शाखा आवडते हे त्याला मात्र कळत नव्हतं. त्याला १६०९ मध्ये डॉक्टरची पदवी मिळाली. त्याच वर्षी त्याच लग्न एका मार्गारेट नावाच्या श्रीमंत घरातील मुलीशी झालं. त्याला त्याच्या विवाहाच्यावेळी सासुरवाडी कडून अधिक संपत्ती मिळाल्यामुळे त्याला त्याच्या कुटुंबासाठी संपत्ती कमवायची फारशी गरज पडली नाही. त्यामुळे त्याने आपलं जीवन विज्ञानात संशोधन करण्यासाठी पणाला लावलं !
आपल्या भोवती जी ‘हवा ‘ आहे ती अनेक वायूंचे मिश्रण असते हे त्याने सर्वात प्रथम मांडल होत . त्यानं त्यासाठी खास ‘गॅस’ हे नाव वायूला सुचवलं होतं. त्यातही त्याने पुढे बरं संशोधन केलं होतं.हेल्मोटरच्या या संशोधन जीवनात त्याने जी बायोकेमिस्ट्रीची सुरुवात केली होती. ती नंतरच्या काळात अनेकांनी पुढे नेली. ती आजही पुढे सुरू आहे !
— अथर्व डोके.
संकेतस्थळ: www.vidnyandarpan.in.net
ईमेल: atharvadoke40@gamil.com
YouTube: Marathi Science Rural Laboratory
Leave a Reply