आज सुरेश भट याचा जन्मदिवस. यांना जाऊन इतकी वर्षे झाली तरीही येणाऱ्या पिढीवर आणि भावी पिढीवर त्याच्या गजलचे गारुड आहेच आणि तसेच राहील यावरून एक प्रसंग आठवला , एकदा प्रवीण दवणेबरोबर पुण्याला गेलो होतो , प्रवीण दुसऱ्याची बोलत होता , मी एका मोठ्या वजनदार समीक्षका बरोबर बोलत होतो , भटाची गजल ही एक शब्द्गुफण आहे सागून मला समजावत होता…मला भटाची गजल अजूनही आवडते..मी सर्व आईकून घेतले आणि म्हणालो जग तुम्हाला विसरेल , पण भटांना नाही..प्रवीणला हे कळले तेव्हा तो हसून म्हणाला त्याच्याशीपण घेतलास पंगा…
तात्पर्य तो समीक्षक चौकटीतच राहिला आणि भट अजूनही सर्वमान्य…
देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले
गेले ते उडुन रंग
उरले हे फिकट संग
हात पुढे करण्याचे वय निघून गेले
कळते पाहून हेच
हे नुसते चेहरेच
चेहऱ्यांत जगण्याचे वय निघून गेले
रोज नवे एक नाव
रोज नवे एक गाव
नावगाव पुसण्याचे वय निघून गेले
रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले
हृदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे वय निघुन गेले
एकटाच मज बघून
चांदरात ये अजून
चांदण्यात फिरण्याचे वय निघून गेले
आला जर जवळ अंत
कां हा आला वसंत?
हाय,फुले टिपण्याचे वय निघून गेले
सुरेश भट यांची हीं कविता आजही विचार करण्यास लावते
— सतीश चाफेकर
Leave a Reply