
इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्र समूहाने १४ जानेवारी १९४८ रोजी मुंबईहून लोकसत्ता हे दैनिक सुरु केले. त्र्यं. वि. पर्वते हे त्याचे पहिले संपादक होत. त्यानंतर ह. रा. महाजनी संपादक झाले. त्यांची कारकीर्द लक्षणीय ठरली. अष्टपैलू लेखणी आणि संपादकीय कौशल्य यांच्या साहाय्याने त्यांनी लोकसत्ता लोकप्रिय केले.
महाजनी यांच्या नंतर र. ना. लाटे, विद्याधर गोखले आणि माधव गडकरी, कुमार केतकर, अरुण टिकेकर यांनी लोकसत्ताच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली. सध्या गिरीश कुबेर हे लोकसत्ताचे संपादक आहेत.
लोकसत्ता मुंबई, ठाणे, महामुंबई, वसई-विरार, पुणे, नाशिक व नागपूर येथून प्रकाशित होते. याशिवाय मुंबईतून सांज लोकसत्ता हे सायंदैनिकही प्रसिद्ध होते. लोकप्रभा साप्ताहिक लोकसत्ताचे प्रकाशन आहे. यात करिअर, अर्थ, रविवार, नागपूर, नाशिक वृत्तांत, लोकसत्ता मुंबई, महामुंबई, ठाणे, वसई-विरार, पुणे आणि चतुरंग, वास्तुरंग या पुरवण्या आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply